कोपरांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय:
सर्वच ऋतूंमध्ये वातावरणात आद्र्रता असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऊन असल्यामुळे हातपाय काळे पडतात, तर इतर ऋतूंमध्ये वातावरणातील आद्र्रतेमुळे हातपाय काळे पडू लागतात. हातापायांच्या कोपऱ्यांची किंवा गुडघ्यांची योग्य रित्या काळजी घेतली नाहीतर गुडघे आणि हातांचे कोपरे काळे पडून जातात. हात आणि पायांचा राग शरीराच्या इतर अवयवांपासून वेगळा असतो. बऱ्याचदा अनेकांच्या हातांचे कोपरे पूर्णपणे काळे पडून जातात. हातांचे कोपरे काळे झाल्यामुळे चारचौघात घेल्यानंतर लाजल्या सारखे होते. तर काहीवेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. त्यामुळे महिला बाहेर जाताना किंवा इतर वेळी पूर्ण हात झाकले जातील असे कपडे घालून जातात.
हाताच्या कोपऱ्यांचा काळेपणा वाढल्यानंतर हळूहळू हातसुद्धा काळे दिसू लागतात. पण काही लोक त्वचेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. हात पायांच्या स्वच्छतेकडे लक्ष देत नाहीत. पण यामुळे हातांचा काळेपणा वाढत जातो. हातांच्या कोपऱ्यांचा वाढलेला काळेपणा लवकर निघून जात नाही. त्यामुळेच वेळीच लक्ष देऊन त्वचेची काळजी घ्यावी. केमिकल प्रॉडक्ट किंवा इतर कोणतीही चुकीचे पदार्थ त्वचेवर लावल्यामुळे त्वचा काळी पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्वचेवर कोणतेही केमिकल प्रॉडक्ट लावण्याआधी योग्य ती काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला हातांच्या कोपऱ्याचा काळेपणा घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. हा उपाय नक्की करून पहा.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: October heat मध्ये उन्हापासून कसा कराल बचाव? अशी घ्या शरीराची काळजी
हे देखील वाचा: केसांच्या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय कोरियन हेड स्पा, जाणून घ्या स्पा करण्याची सोपी पद्धत
त्वचेच्या काळजी घेण्यासाठी केमिकल उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करून पहा. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवरील चमक पुन्हा वाढण्यास मदत होईल. लिंबामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ज्यामुळे काळी पडलेली त्वचा उजळण्यास मदत होते. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे सर्व प्रकारच्या त्वचेच्या रोगांपासून सुटका मिळवण्यास मदत होते. कोरफड जेल त्वचेला लावल्यामुळे मृत पेशी निघून जाऊन त्वचा उजळण्यास मदत होते.