चष्मा लावून नाकावर आलेले डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय
सतत लॅपटॉप, मोबाईल फोन पाहून अनेकांना खूप कमी वयातच चष्मा लावावा लागतो. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हल्ली सगळ्यांच्या डोळ्यांवर चष्मा आहेच. सतत मोबाईल पाहून कमी झालेली दृष्टी सुधारण्यासाठी चष्मा लावला जातो. पण सतत चष्मा लावल्यामुळे डोळ्यांच्या खालची त्वचा आणि नाकावर काळे डाग पडण्यास सुरुवात होते. चष्मा लावल्यामुळे नाकावर डाग पडू लागतात. हे डाग काही केलं तरीसुद्धा लवकर निघून जात नाही. महिला पुरुषांच्या नाकावर चष्मा लावून आलेले डाग घालवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे तुमच्या नाकावर आलेले डाग निघून जाण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
कोरफड जेल त्वचेसाठी अतिशय गुणकारी आणि प्रभावी आहे. कोरफड जेलचा वापर केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि उठावदार दिसते. तसेच त्वचेमधील उष्णता कमी करण्यासाठी अनेक लोक कोरफड जेल त्वचेला लावतात. नाकावर आलेले डाग घालवण्यासाठी वाटीभर कोरफड जेल घेऊन त्यात दोन ते तीन थेंब लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर तयार मिश्रण नाकावर लावून ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने नाकावर मसाज करून चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास नाकावरील डाग निघून जाण्यास मदत होईल.
हे देखील वाचा: पावसाळ्यानंतर त्वचेवर असतो कोरडेपणाचा सावट; अशा प्रकारे राखा निगा, स्वस्थ आरोग्य जगा
त्वचेवरील डाग घालवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा वापर केला जातो. यासाठी कच्च बटाटा घेऊन किसून घ्या. त्यानंतर त्यातील रस काढून नाकावर डाग आलेल्या ठिकाणी लावा. नाकावर लावून झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करा आणि पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या नाकावरील डाग निघून जातील. बटाट्यमध्ये विटामिन सी असते, ज्यामुळे त्वचेवर आलेले डाग सहज निघून जाण्यास मदत होते.
काकडीमध्ये 90 टक्के पाणी असते. काकडीमध्ये असलेल्या थंडाव्यामुळे त्वचेवरील त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच अनेकदा त्वचेवरील डाग घालवण्यासाठी काकडीचा वापर केला जातो. नाकावरील डाग घालवण्यासाठी सर्वप्रथम काकडीचे गोलाकार पातळ तुकडे करून घ्या. त्यानंतर हे तुकडे फ्रिजमध्ये ठेवून थंड करा. थंड झालेल्या तुकड्यांच्या मदतीने नाकावर आणि संपूर्ण चेहऱ्यावर मसाज करा. हा उपाय आठवडाभर नियमित केल्यास नाकावरील डाग निघून जातील.
हे देखील वाचा:डोक्यातला स्ट्रेस जेव्हा चेहऱ्यावर येतो तेव्हा ‘अशाप्रकारे’ केस आणि त्वचा होते खराब
संत्र्याची साल अनेक लोक फेकून देतात. पण त्वचेसाठी संस्त्र्याची साल गुणकारी आहे. संत्र्याची सालउन्हात सुकवून त्याची बारीक पावडर तयार करून त्यात कच्चे दूध घालून मिक्स करा. जाडसर पेस्ट तयार झाल्यानंतर नाकावर लावून काहीवेळ हलक्या हाताने मसाज करा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. ही पेस्ट तुम्ही त्वचेवर सुद्धा लावू शकता.