फोटो सौजन्य: iStock
आजकाल प्रत्येक जण स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यात गुंतला आहे. अशावेळी ती स्वप्न पूर्ण न झाल्यास अनेक जणांना स्ट्रेस येऊ लागतो. हल्ली बदलती लाइफस्टाइल सुद्धा याला कारणीभूत आहे. आज आपले सर्वांचेच जीवन एवढे व्यस्त झाले आहे की आपल्याला इतर गोष्टींसाठी वेळच मिळत नसतो. आज कित्येक जण जॉब करून घेणारी येतात तेव्हा त्यांच्याकडे पाहूनच समजते की हे तणावाखाली जगात आहे. तर दुसरीकडे असे कित्येक तरुण आहेत जे सोशल मीडियावरून प्रभावित होऊन डोक्यात स्ट्रेस घेऊन बसतात.
पण तुम्हाला माहीत आहे का की स्ट्रेस घेण्याने तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तसेच तुमच्या त्वचेवर आणि केसांवर खोलवर परिणाम होऊ शकतो? तज्ञ म्हणतात की दीर्घकाळ तणावामुळे तुमची त्वचा कोरडी, निर्जीव आणि वाईटरित्या प्रभावित होऊ शकते. शिवाय, हे केस गळण्याचे मुख्य कारण बनू शकते.
हे देखील वाचा: 40% पेक्षा जास्त रुग्णांना LDLC पातळीबद्दल माहिती नाही, मुंबईतील डॉक्टरांचे निरीक्षण
जेव्हा एखादा व्यक्ती स्ट्रेस म्हणजेच तणावाखाली असतो तेव्हा शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोनचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्वचेची नैसर्गिक नमी कमी होऊ लागते, त्यामुळे त्वचा कोरडी आणि खडबडीत होते. याशिवाय तणावामुळे तुमच्या त्वचेतील बारीक रेषा आणि सुरकुत्या देखील वाढू शकतात. अनेकदा तणावामुळे चेहऱ्यावर मुरुम आणि एक्जिमासारख्या समस्याही उद्भवू शकतात.
दीर्घकाळ तणावाखाली असलेल्या लोकांच्या त्वचेत लालसरपणा, सूज आणि चिडचिड यांसारखी लक्षणे दिसू शकतात, असे त्वचातज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय त्वचेवर काळी वर्तुळे आणि थकलेली त्वचा हे देखील तणावाचे परिणाम आहेत.
तणाव हा केसांचाही मोठा शत्रू ठरू शकतो. दीर्घकाळ तणावामुळे केस गळणे सामान्य होते. याचे कारण म्हणजे तणावाच्या काळात शरीरात हार्मोनल असंतुलन होते, ज्यामुळे केसांच्या वाढीवर परिणाम करते. त्यामुळे केस लवकर गळतात आणि त्यांची डेन्सिटी कमी होते. तणावामुळे केसांची मुळे कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे केस पातळ होतात आणि ते तुटण्याची शक्यता वाढते. याशिवाय, काही प्रकरणांमध्ये, तणावामुळे केस पांढरे होऊ लागतात. तसेच टाळूवर कोंडा देखील निर्माण होऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते, योग, ध्यान आणि नियमित व्यायाम हे स्ट्रेस कमी करण्याचे प्रभावी मार्ग आहेत. तसेच, वेळोवेळी विश्रांती घेणे आणि योग्य झोप घेणे देखील महत्वाचे आहे. आरोग्यदायी आहार आणि त्वचेची निगा राखून त्वचा आणि केस निरोगी ठेवता येऊ शकतात. म्हणूनच, जर तुम्हाला तुमची त्वचा आणि केस निरोगी ठेवायचे असतील तर तणाव कमी करणे अत्यंत आवश्यक आहे.