फोटो सौजन्य - Social Media
पावसाळ्यामध्ये अनेक आजार उत्पन्नास येतात. अशा वेळी, लोकं आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये फार जागृत असतात. बहुतेक जण या दिवसांमध्ये गरम पाणी पितात, जेणेकरून खोकला-सर्दीसारख्या समस्यांपासून स्वतःला वाचवता येईल. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आजाराची साथ पसरते. परंतु ही साथ, पावसाळा गेला तरी मानवाची काय साथ सोडत नाही. प्रत्येक ऋतूमध्ये कोणत्याना कोणत्या आजाराचे सावट हे असतेच. आता पावसाळा परतीच्या दिशेने आहे. जरी आता मोकाट होऊन कोसळत असला तरी त्याचे फारसे दिवसच उरले आहेत. हिवाळा उंबरठ्यावर आहे. सुंदर वातावरणासहित असंख्य समस्यांना घेऊन येण्यास हिवाळा सज्ज आहे. चला, आपण ही या समस्यांना चार हात करण्यात सज्ज होऊया.
हे देखील वाचा : वजन वाढतंय? सावध व्हा ! पोटामध्ये वाढणारी चरबी आमंत्रण देते ‘या’ आजारांना
हिवाळा मानवाच्या त्वचेवर मोठा परिणाम दर्शवतो. हिवाळ्याची सुरुवात होताच त्वचेवर रॅशेस येणे, कोरडी त्वचा तसेच सायरोसिससारख्या समस्यांचा वर्षाव होण्यास सुरुवात होते. या काळात बहुतेक जण आपल्या त्वचेला आणखीन जपण्यास सरुवात करतात. खरं तर, या ऋतूमध्ये प्रत्येकाने ते केले पाहिजे. या काळामध्ये आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी काही टिप्स आहेत, ज्यांचे अनुसरण करणे आपल्याला नक्कीच फायद्याचे ठरेल.
पावसाळा संपायचा काळ सुरु झाला कि आपल्या पित्तावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. पित्तदोषाचा परिणाम त्वचेवर होतो, त्यामुळे सर्वांनी याबाबत काळजी केली पाहिजे. पित्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोरडे आणि बेकरी उत्पादक खाद्यपदार्थांचे सेवन कमी करावे. तसेच तळलेले खाद्यपदार्थांना खाणे कमी करावे. या दिवसांत ‘पेट सफा, हर रोग दफा’ या सूत्रानुसार सगळ्यांनी मार्गीक्रमन करावे, याने त्वचेवर चमक राहील. खाण्यामध्ये हिरव्या भाज्या जास्त खाव्यात. पाचन तंत्र मजबूत ठेवण्यासाठी हिरव्या भाज्या उत्तम ठरतात.
हे देखील वाचा : 40% पेक्षा जास्त रुग्णांना LDLC पातळीबद्दल माहिती नाही, मुंबईतील डॉक्टरांचे निरीक्षण
शारदाच्या ऋतूमध्ये रक्तदाबाचा त्रास वाढतो. या काळात, नियमित हलक्या पद्धतीचे व्यायाम आणि योगसाधना केल्याने शरीरामध्ये रक्तसंचार वाढतो. या काळात हलके भोजन करावे. गहूच्या चपातीच्या जागी मुगाच्या डाळीच्या रोट्या बनवून खाव्यात. त्वचेवरील समस्यापासून लांब राहण्यासाठी स्वतःला नेहमी हायड्रेट ठेवा. किमान ८ ते १० ग्लास पाणी पीत चला. नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेत चला.