पिवळे दात चारचौघात आपली लाज काढतात; पण आता चिंता नको, शून्य रुपयांत घरबसल्या मिळवता येईल पांढरीशुभ्र चमक
जर तुमच्या दातांवर हट्टी पिवळसर थर जमला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. ही एक सामान्य समस्या आहे, जी चुकीच्या आहाराच्या सवयींमुळे, तोंडाची योग्य स्वच्छता न ठेवण्यामुळे किंवा तंबाखूच्या सेवनामुळे होऊ शकते. अशा वेळी, महागडे डेंटल ट्रीटमेंट्स किंवा केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरण्याआधी काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय वापरून पाहू शकता. हे उपाय केवळ दात पांढरे व चमकदार करण्यात मदत करत नाहीत, तर हिरड्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. योग्य पद्धतीने हे उपाय केल्यास तुमच्या हास्याची हरवलेली चमक परत मिळू शकते.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा दातांवर जमलेला प्लाक काढण्यात उपयुक्त ठरतो. पाव चमचा बेकिंग सोडा थोड्या टूथपेस्टमध्ये मिसळा. या मिश्रणाने दात स्वच्छ करा आणि कोमट पाण्याने कुल्ला करा. हा उपाय आठवड्यातून केवळ एक-दोन वेळाच करा, कारण वारंवार वापरल्यास दातांच्या एनॅमलला नुकसान होऊ शकते.
संत्र्याची साल
संत्र्याच्या सालीत असलेले व्हिटॅमिन C आणि कॅल्शियम दातांवरील पिवळसर थर कमी करण्यास मदत करतात. झोपण्याआधी ताजे संत्र्याचे साल दातांवर हलक्या हाताने चोळा. काही आठवडे नियमित केल्यास चांगले परिणाम दिसून येतील.
हायड्रोजन पेरॉक्साइड
हायड्रोजन पेरॉक्साइडमध्ये हलका ब्लीचिंग गुणधर्म असतो, जो दात पांढरे करण्यास मदत करतो. युक्त माउथवॉशने गुळण्या करू शकता किंवा बेकिंग सोड्यासोबत मिसळून पेस्ट तयार करू शकता. मात्र हा उपाय करताना काळजी घ्या, कारण त्यामुळे हिरड्यांना जळजळ होऊ शकते आणि दात संवेदनशील होऊ शकतात.
लिंबू
लिंबाच्या नैसर्गिक ब्लीचिंग गुणांमुळे पिवळसरपणा कमी होतो. काही थेंब लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट दातांवर हलक्या हाताने चोळा. काही मिनिटांनी पाण्याने कुल्ला करा. दोन आठवडे दररोज दोनदा हा उपाय केल्यास फरक जाणवेल.
ऑइल पुलिंग
या पद्धतीत तोंडात तेल भरून काही वेळ फिरवले जाते. दोन चमचे नारळाचे तेल तोंडात घेऊन १५-२० मिनिटे फिरवा. ही प्रक्रिया तोंडातील जीवाणू कमी करून प्लाक आणि पिवळसरपणा दूर करण्यास मदत करते, तसेच दात स्वच्छ व निरोगी ठेवते.
कोणत्या कमतरतेमुळे दात पिवळे होतात?
कॅल्शियम शोषण्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्याशिवाय तुमचे दात कमकुवत आणि रंगहीन होऊ शकतात.
कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे दात दुखतात?
कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी१२ या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे दात दुखू लागतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.