
सतत पोट फुगलेलं राहतं? गॅस वरती चढतेय... तव्यावर भाजून बनवा घरगुती चूर्ण; बद्धकोष्ठता-मुळव्याध्यावर घरगुती उपाय
या पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी बाजारात अनेक औषधं उपलब्ध आहेत पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीदेखील सोपे उपाय करुन तुमच्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवू शकता. दीर्घकालीन औषधांचा शरीरावर नकारात्मक परिणाम देखील होऊ लागतो. आज आम्ही तुम्हाला या लेखात सोप्या पद्धतीमध्ये घरगुती चुर्ण कसा तयार करायचा ते सांगणार आहोत. या चूर्णाचे सेवन करुन पोटाच्या अनेक समस्यांपासून आराम मिळवला जाऊ शकतो. चला चूर्ण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आणि बनवण्याची पद्धत जाणून घेऊया.
साहित्य
पावडर कशी घ्यावी
जेवणानंतर सुमारे १५ मिनिटांनी कोमट पाण्यासोबत तुम्ही हे चूर्ण घेऊ शकता. जर कुटुंबातील एखाद्याला जास्त गॅसचा त्रास होत असेल किंवा तो बराच काळ या समस्येने ग्रस्त असेल, तर तो सलग १० दिवस दररोज हे पावडर घेऊ शकतो. त्यानंतर, जेव्हा जेव्हा त्याला गॅस, पोटफुगी किंवा जडपणा जाणवतो तेव्हा एक चमचा ही पावडर घेणे पुरेसे आहे. या चूर्णाचा वापर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच करता येते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.