Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Horror Story : “Bus Route 375” गाडीत डिझेल नव्हे तर फक्त रक्तरंजित; ती रात्र… ती बस… आणि ते तीन रहस्यमय प्रवासी!

१४ नोव्हेंबर १९९५ रोजी Beijing येथे रात्री उशिरा धावणाऱ्या Bus Route 375 बसमध्ये एक गूढ आणि भयानक घटना घडल्याची कथा सांगितली जाते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 14, 2026 | 06:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

१४ नोव्हेंबर १९९५ ची ती थंडगार रात्र होती. चीनची राजधानी Beijing शांततेत झोपली होती. मध्यरात्रीचे वातावरण, रस्त्यांवर विरळ वाहतूक आणि धुक्याची हलकी चादर… अशा भयाण शांततेत एक बस आपला नेहमीचा प्रवास करत होती. ही होती रहस्यमय म्हणून ओळखली जाणारी Bus Route 375. ही बस Yuanmingyuan येथून सुटून Fragrant Hills या डोंगराळ भागाकडे जात होती. साधारण १६ किलोमीटरचा हा मार्ग होता. रात्री उशिरा असल्यामुळे बसमध्ये फारसे प्रवासी नव्हते—फक्त चालक, महिला कंडक्टर, एक वृद्ध व्यक्ती, एक तरुण आणि आणखी काही प्रवासी.

Horror Story : भयानक हॉस्टेल…! चेहरा काळा, डोळे लाल, प्रवेश करताच दिसते ‘ती’ ची सावली, कथा वाचताच उडेल तुमचाही थरकाप

बस शांतपणे पुढे जात होती. थोड्याच वेळात ती Summer Palace परिसरात पोहोचली. त्या वेळी धुके अधिक दाट झाले होते. बस थांबताच तीन प्रवासी चढले. त्यांच्या दिसण्यानेच वातावरण अचानक बदलले. ते तिघेही विचित्र पद्धतीने उभे होते. त्यांच्या कपड्यांचा पोशाख खूप जुना वाटत होता, जणू काही शेकडो वर्षांपूर्वीचा. सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या तिघांपैकी दोन जण तिसऱ्या व्यक्तीला दोन्ही बाजूंनी धरून उभे होते. जणू तो स्वतः चालू शकत नव्हता. बसमधील प्रवाशांना हे दृश्य खूपच विचित्र वाटत होते, पण कोणी काही बोलले नाही.

बस पुढे निघाली. काही वेळानंतर त्या वृद्ध प्रवाशाने अचानक मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. तो म्हणाला की, त्या तरुणाने त्याचा पर्स चोरला आहे. बसमध्ये गोंधळ उडाला. कंडक्टरने बस थांबवली आणि त्या तरुणाला व वृद्धाला खाली उतरायला सांगितले. दोघेही रस्त्यावर उतरले. बस पुन्हा पुढे निघून गेली… आणि त्या दोघांचे जीव अक्षरशः वाचले. बस निघून गेल्यानंतर वृद्धाने त्या तरुणाला शांतपणे सांगितले की, त्याने पर्स चोरीचा आरोप मुद्दाम केला. कारण बसमध्ये चढलेले ते तीन प्रवासी माणसं नव्हते! धुक्यातून त्यांच्या चेहऱ्यांचे प्रतिबिंब दिसत नव्हते आणि त्यांच्या पायांची हालचालही विचित्र होती. वृद्धाला खात्री झाली होती की काहीतरी भयानक घडणार आहे, म्हणून त्याने तरुणाला बसमधून उतरवण्यासाठी हा नाटक केला.

पुढच्या दिवशी सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आली. ती बस गायब झाली होती. शोधमोहीम सुरू झाली. काही दिवसांनी ती बस शहराबाहेरील एका निर्जन भागात सापडली.

Horror Story : चिंदर गावाची अनोळखी प्रथा! भूतांसाठी गाव केले जाते मोकळे

पोलिसांनी बस तपासली तेव्हा अनेक विचित्र गोष्टी समोर आल्या. बसमध्ये चालक आणि कंडक्टरचे मृतदेह सापडले होते. त्याहून भयानक म्हणजे बसच्या टाकीत डिझेलऐवजी रक्तासारखा द्रव असल्याची चर्चा पसरली. अधिकृत तपासात अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले. या घटनेनंतर चीनमध्ये “बस रूट ३७५” ही कथा एक भयानक शहरी दंतकथा बनली. आजही बीजिंगमध्ये या घटनेबद्दल बोलले जाते तेव्हा लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. ती रात्र… ती बस… आणि ते तीन रहस्यमय प्रवासी—आजही या कथेचे गूढ कायम आहे. काहीजण याला फक्त अफवा म्हणतात, तर काहींना वाटते की त्या रात्री त्या बसमध्ये काहीतरी अतिमानवी घडले होते. पण एक गोष्ट मात्र नक्की—ही कथा ऐकताना आजही अनेकांच्या अंगावर शहारे येतात.

Web Title: Horror story bus route 375

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 06:23 PM

Topics:  

  • China
  • haunted place
  • horror story
  • kokan

संबंधित बातम्या

UN 2026  :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर
1

UN 2026 :तुम्ही म्हणाल तेच कसं होईल ? इराण ,क्युबावर चीनचे अमेरिकेला आक्रमक उत्तर

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा
2

US China -चीन-अमेरिकेतील व्यापारयुद्धाला ब्रेक? ३० अब्ज डॉलरच्या शुल्क कपातीवर सहमती; AI वरही चर्चा

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
3

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
4

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.