Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Horror Story : कोकणात ‘गिऱ्हा’ तिकडे ‘पंडुबा’! पाण्यात खेचू लागली विकृत आकृती; आई म्हणाली “माझ्या बाळाला…”

Biharच्या ग्रामीण भागात ‘पंडुबा’ नावाची भयानक लोककथा प्रसिद्ध आहे. पंडुबा पाण्यात राहणारी अमानवी शक्ती असून ती ओळखीच्या व्यक्तीच्या आवाजात लोकांना फसवते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 29, 2026 | 03:37 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

बिहारच्या ग्रामीण भागात आजही अनेक अशा लोककथा प्रचलित आहेत, ज्या ऐकून अंगावर काटा येतो. तिथल्या नद्या आणि तलावांच्या काठी रात्रीच्या वेळी एक अमानवी सावट वावरते, ज्याला स्थानिक भाषेत ‘पंडुबा’ (Pandubba) असे म्हटले जाते. ही केवळ एक कथा नसून तिथल्या मच्छीमारांच्या जीवनातील एक जिवंत दहशत आहे. असे मानले जाते की, पंडुबा ही एक अशी अमानवी शक्ती आहे जी पाण्यात राहते. याची सर्वात भयानक गोष्ट म्हणजे, हे कोणाचेही रूप घेऊ शकते आणि तुमच्या जवळच्या माणसाच्या आवाजात तुम्हाला हाक मारते. रात्रीच्या शांततेत जेव्हा एखादा माणूस तलावाकाठी असतो, तेव्हा त्याला आपल्या आईची, वडिलांची किंवा मित्राची हाक ऐकू येते. एकदा का त्या माणसाने मागे वळून पाहिले की, पंडुबा त्याला संमोहित करून खोल पाण्यात खेचून नेते.

Horror Story : चिंदर गावाची अनोळखी प्रथा! भूतांसाठी गाव केले जाते मोकळे

कथेचा नायक रघु, जो एका गरीब मच्छीमार कुटुंबातला मुलगा आहे. रघुचे वडील उत्तम पोहणारे आणि अनुभवी मच्छीमार होते, पण एक दिवस त्यांचा मृतदेह तलावात तरंगताना सापडला. सर्वांना वाटले की त्यांचा बुडून मृत्यू झाला, पण या मृत्यूमागे काहीतरी वेगळेच रहस्य होते. घराची संपूर्ण जबाबदारी आता रघुवर आली होती. परिस्थितीमुळे रघुने शिक्षण सोडून वडिलांचाच व्यवसाय करण्याचे ठरवले. दिवसभराच्या कामात म्हणावे तसे मासे मिळत नव्हते, म्हणून रघुने एक धाडसी निर्णय घेतला, रात्रीच्या वेळी तलावात जाऊन मासे पकडण्याचा. त्याच्या काकांनी त्याला वारंवार बजावले होते की, “रघु, रात्रीच्या वेळी हा तलाव आपला नसतो. तिथे पंडुबाचे राज्य असते. तुला कितीही आवाज आले तरी मागे वळून पाहू नकोस.” पण तरुणाईच्या जोशात रघुने याकडे दुर्लक्ष केले.

एका रात्री रघु आपली नाव घेऊन तलावाच्या मध्यभागी पोहोचला. आजूबाजूला घनदाट अंधार आणि स्मशान शांतता होती. अचानक, त्याला मागून एक स्पष्ट आवाज ऐकू आला “रघु… अरे रघु, इकडे बघ!” तो आवाज त्याच्या मृत वडिलांचा होता. रघुच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याला वडिलांना पाहण्याची तीव्र इच्छा झाली, पण काकांचे शब्द आठवले. त्याने स्वतःला आवरले. पण थोड्याच वेळात त्याला जाणवले की, त्याची नाव पुढे सरकत नाहीये. कोणीतरी ती खालून घट्ट पकडून ठेवली होती. त्याने भीतीने पाण्यात वाकून पाहिले आणि त्याचे डोळे विस्फारले. पाण्याखाली एक भयानक मानवी आकृती होती, जिचे डोळे निळ्या प्रकाशासारखे चमकत होते. ते डोळे रघुला जणू संमोहित करत होते. रघूला शुद्ध उरली नाही आणि तो नकळत त्या डोळ्यांकडे ओढला जाऊ लागला.

कसाबसा स्वतःला सावरून रघु घरी परतला. तो प्रचंड घाबरलेला होता. त्याची अवस्था पाहून आईने त्याला जवळ घेतले आणि एक धक्कादायक सत्य सांगितले. रघुचे वडीलही अशाच प्रकारे एके रात्री घाबरून घरी आले होते. त्यांनाही पंडुबाने हाक मारली होती आणि काही दिवसांतच त्यांनी स्वतःहून तलावात उडी मारून जीव दिला होता. पंडुबा एकदा कोणाच्या मागे लागली की त्याला मृत्यूच्या दारापर्यंत नेल्याशिवाय सोडत नाही. त्या रात्री रघुला पुन्हा तेच आवाज ऐकू येऊ लागले. तो संमोहित अवस्थेत उठला आणि तलावाकडे चालू लागला. आईने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण रघुच्या शरीरात जणू दुसरीच शक्ती संचारली होती. रघु तलावाच्या काठावर पोहोचला आणि पाण्यात पाऊल ठेवणारच होता, इतक्यात त्याची आई तिथे धावून आली.

Horror Story : भीमाशंकर ट्रेकचा ‘तो’ थरार! चकव्यात अडकली ट्रेकर मंडळी; पुन्हा-पुन्हा तीच झाडं, तोच निळा कॅन

रघुची आई तलावाच्या लाटांकडे पाहून ओरडली, “जर तुला माझ्या मुलाचा बळी हवा असेल, तर आधी मला घेऊन जा! एका आईच्या प्रेमापेक्षा मोठी शक्ती या जगात नाही!” तिने देवाची प्रार्थना केली आणि स्वतःचे प्राण देण्याची तयारी दर्शवली. आईची ती आर्त हाक आणि तिचे निस्वार्थ प्रेम पाहून पंडुबाची शक्ती क्षीण झाली. तलावातील खवळलेल्या लाटा अचानक शांत झाल्या आणि रघु पुन्हा शुद्धीवर आला. रघु त्या रात्री मृत्यूच्या दाढेतून परतला होता. त्या दिवसापासून त्याने कधीही रात्रीच्या वेळी तलावाकडे पाऊल टाकले नाही. ही कथा आपल्याला शिकवते की, ज्या गोष्टींना आपण जुन्या कथा म्हणून हिणवतो, त्या अनेकदा अनुभवातून आलेल्या सावधानतेच्या सूचना असतात. बिहारच्या अनेक भागांत आजही रात्रीच्या वेळी तलावाकाठी पंडुबाच्या कथा आणि तिथली शांतता माणसाच्या मनात धडकी भरवते.

टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)

Web Title: Horror story of panduba haunt fishermen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • horror story
  • kokan

संबंधित बातम्या

कोकण की पश्चिम महाराष्ट्र? कुठे जास्त चटके बसणार? जाणून घ्या Weather Report
1

कोकण की पश्चिम महाराष्ट्र? कुठे जास्त चटके बसणार? जाणून घ्या Weather Report

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.