Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Horror Story : ‘इथून निघून जा,नाहीतर…!’ किंचाळण्याचा आवाज, मजुरांच्या अंगावर काठीचे वळ; जंगल वाचवण्यासाठी उभा राहिला ‘राखणदार’

कोकणात ‘राखणदार’ ही अदृश्य पण लोकांना वाईटापासून दूर ठेवणारी शक्ती मानली जाते. मुंबईतील करण नावाचा तरुण रत्नागिरीत रान तोडण्यासाठी गेला, पण गावकऱ्यांनी त्याला वारंवार थांबवण्याचा इशारा दिला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 16, 2026 | 01:46 PM
Horror Story : ‘इथून निघून जा,नाहीतर…!’ किंचाळण्याचा आवाज, मजुरांच्या अंगावर काठीचे वळ; जंगल वाचवण्यासाठी उभा राहिला ‘राखणदार’
Follow Us
Close
Follow Us:

कोकणात राखणदार हा फार मोठा विषय आहे कारण राखणदार ही अदृश्य शक्ती जरी असली तरी वाईट नाही. ती फक्त लोकांना वाईट करण्यापासून आणि वाईट होण्यापासून दूर ठेवते, जोपर्यंत आपण त्याचे ऐकू तोपर्यंत आपले वाईट होणार नाही आणि त्याच्या शब्दांच्या पलीकडे गेलात तर पुढे काही होईल हे फक्त राखणदारालाच ठाऊक! अशीच काही उदाहरणे सांगणारे घटना कोकणात नेहमी घडत असतात. त्यापैकी एक पुढीलप्रमाणे :

Horror Story : भयानक हॉस्टेल…! चेहरा काळा, डोळे लाल, प्रवेश करताच दिसते ‘ती’ ची सावली, कथा वाचताच उडेल तुमचाही थरकाप

करण मुंबईत राहणारा आणि इथेच वाढलेला तरुण! आईवडिलांच्या निधनानंतर गावात असणारा रान तोडून तिथे काही तरी नवीन प्रकल्प उभारणाच्या शोधात रत्नागिरीकडे रवाना झाला. गावी तसे त्याचे कुणी राहत नाही. गावाबाहेरून काही 10 ते 15 मजूर पकडले आणि रान तोडण्यासाठी रानात जमले. करणने आधी गावातल्याच काही तरुणांना पैसे देऊन रान तोडण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली पण ते रान तोडण्यासाठी कुणीही तयार नव्हते. याउलट त्यालाच ते रान तोडू नका असे सांगण्यात आले, पण करण कुणाचंच ऐकत नव्हता. शेवटी त्याने गावाशेजारील तरुण गोळा करून आणले.

करणने जशी मंडळी गोळा केली तसे गावातले अनेक गावकरी त्या ठिकाणी जमले आणि इतर जमलेल्या मजूर मंडळीला अडवू लागले. तेव्हा करण स्वतः त्या ठिकाणी येऊन पोहचला आणि त्याने सगळ्यांसमोर आणि सगळ्यांच्या विरोधात कुऱ्हाडीने पहिला घाव रानातील एका झाडावर घातला, जसा तो घाव पडला तसाच जंगलाच्या आतून कुणीतरी वृद्ध किंचाळण्याचा एकच आवाज सगळीकडे घुमला. सगळे गावकरी तेथून पळून गेले, पण करण आणि त्याच्या मजुरांनी तेथे झाडे तोडण्याची कामे सुरूच ठेवली.

त्या रात्री करण झोपेत असताना त्याला खोलीच्या बाहेरून कुणी तरी काठी टेकत असल्याचे भास येत होता. त्याच्या कानात घुंगरूंचे स्वर आणि दुपारची जंगलातून आलेली ती किंचाळी खिणखिणत होती. तो मुळीच झोपला नाही. पण दुसऱ्या दिवशी काही अजबच घडलं. रानात एकही मजूर आलेला नव्हता. त्यांना बोलावण्यासाठी करण शेजारच्या गावात गेला तेव्हा ते मजूर तिथे येण्यासाठी नकार देऊ लागले. करणने त्यांना जास्ती मजूर देणार असे वाचन दिले तरीही कुणीही येण्यास नव्हते. त्या सगळ्या मजुरांच्या अंगावर काठीचे वळ उठलेले होते जणू त्यांना कुणी बेदम मारलं आहे. त्यामुळे त्यांना येथे यायचेही नव्हते.

Horror Story : चिंदर गावाची अनोळखी प्रथा! भूतांसाठी गाव केले जाते मोकळे

शेवटी, आपण रान तोडले नाही तर आपली सगळ्या गावकऱ्यांसमोर नाचक्की होईल असे करणला वाटले आणि तो एकटाच कुऱ्हाड घेऊन रानात पोहचला. त्याने कुऱ्हाड जोरात एका झाडावर चालवली आणि अचानक वातावरण बदलले. पाऊस बरसू लागला आणि जंगलातून एक वृद्ध पण साडे 7 फुटी म्हातारा बाहेर आला आणि करणसमोर उभा राहिला. त्या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. पण ‘राखणदारा’समोर कोण टिकणार? दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना करण त्याच रानात एका झाडाला टांगलेला सापडला. गावकऱ्यांना ठाऊकच होतं की हे होणार आहे आणि हे घडलंच! सुदैव म्हणजे करण निदान जिंवत होता.

(टीपः आम्ही देत असणारे हे आर्टिकल काही व्यक्तींसह घडलेले अनुभव आहेत. मात्र आम्ही कोणतीही अंधश्रद्धा पसरवत नाही तर

हे आर्टिकल केवळ माहिती आणि मनोरंजनाकरिता असून Navarashtra.com यासाठी कोणतीही पुष्टी देत नाही)

Web Title: Horror story rakhandar at ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • haunted place
  • horror story

संबंधित बातम्या

Horror Story : “आईला खाल्लं! आता तुला खाणार…” कोकणात शिमग्यात घडलेला भयंकर प्रकार
1

Horror Story : “आईला खाल्लं! आता तुला खाणार…” कोकणात शिमग्यात घडलेला भयंकर प्रकार

Horror Story : ती सगळी भूतं होती! ‘चेंबर्स बिल्डिंग’ मेणासारखं वितळू लागलं अंग, माणसं झाली हैवान! एक मुंबई अशीही
2

Horror Story : ती सगळी भूतं होती! ‘चेंबर्स बिल्डिंग’ मेणासारखं वितळू लागलं अंग, माणसं झाली हैवान! एक मुंबई अशीही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.