Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीसांनी २५ किलो वजन कसं कमी केलं? डॉ. जयश्री तोडकरांनी सांगितला खास फॉर्म्युला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वजन कमी करण्यासाठी कोणता आहार पद्धत अवलंबली, याबाबत बॅरिअाट्रिक सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. '

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 14, 2025 | 02:36 PM
Devendra Fadnavis News:  देवेंद्र फडणवीसांनी २५ किलो वजन कसं कमी केलं? डॉ. जयश्री तोडकरांनी सांगितला खास फॉर्म्युला
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वजन आणि व्यक्तिमत्त्व गेल्या काही वर्षांत लक्षणीय बदललेलं दिसतं.  पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात  झालेला बदल अनेकांच्या नजरेत भरला आहे. त्यांचे वजन आणि एकंदर फिटनेस यामध्ये झालेली कमालीची सुधारणा विशेष लक्षवेधी ठरली आहे. फडणवीस यांनी केवळ ५-१० किलो नव्हे, तर जवळपास २५ किलो वजन कमी केल्याचे समोर आले आहे. हा बदल केवळ त्यांच्या आरोग्यासाठीच नाही, तर एक नेता म्हणून असलेल्या सार्वजनिक प्रतिमेसाठीही महत्त्वाचा ठरला आहे.

अनेकांना वजन कमी करणं आणि फिटनेस मेन्टेन ठेवण कठीण जातं. त्यातच ते राजकीय नेते असतील तर अनेकांना ते शक्यही होत नाही. पण मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असताना, व्यक्त वेळातही त्यांनी आपला फिटनेस मेन्टेन केला, याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. पण फडणवीस यांनी हे यश नेमकं कसं मिळवलं, याबाबतची माहिती प्रसिद्ध बॅरिअाट्रिक सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांनी ‘लगाव बत्ती’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत दिली. डॉ. तोडकर यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्या वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन केलं असून, “माझं वजन डॉ. जयश्री तोडकर यांनीच कमी केलं,” असं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितलं होतं.

Ajit Pawar Pune News: अजित पवारांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ; बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी थेट…

डॉ. जयश्री तोडकर म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस सर प्रामाणिक पेशंट आहेत. पेशंट म्हणता येणार नाही. पण sincere व्यक्ती आहेत. त्यांना आम्ही सांगितलेल्या गोष्टी 80 टक्क्यांहून चांगल्या पद्धतीने फॉलो केल्या. त्यांच्यामध्ये फिटनेसबाबत स्ट्राँग इच्छा होती. मी नवीन जबाबदारी हाती घेत आहे, अशावेळी आपण फिट असायला हवं, याचं महत्त्व त्यांनी जाणलं होतं. त्याबाबत मी त्यांना खूप मार्क देईन. कारण या गोष्टी एखादी व्यक्ती स्वत:हून ठरवत नाही, तोपर्यंत ती या गोष्टी फॉलो करत नाही. त्यांना आम्ही जे सांगितलं ते खूप अवघड असं सांगितलं नाही. खूप साध्या गोष्टी सांगितल्या.

“गुड, बॅड, अग्ली” डायेट प्लॅनने फडणवीस यांचा फिटनेस प्रवास यशस्वी – डॉ. जयश्री तोडकर यांची माहिती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वजन कमी करण्यासाठी कोणता आहार पद्धत अवलंबली, याबाबत बॅरिअाट्रिक सर्जन डॉ. जयश्री तोडकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘लगाव बत्ती’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “आमच्याकडे एक विशिष्ट आहारपद्धती आहे. आम्ही अन्नपदार्थांना ‘गुड’, ‘बॅड’ आणि ‘अग्ली’ अशा तीन प्रकारांत विभागतो.”

गोकुळ दूध संघाच्या नव्या अध्यक्षांची धडाकेबाज सुरूवात;  ऐषारामी संस्कृतीला छेद मोठा निर्णय

त्या पुढे म्हणाल्या, “गुड फूड म्हणजे आरोग्यास पोषक असा आहार. तो आहार व्यक्तीने ८० टक्क्यांहून अधिक प्रमाणात घ्यावा, अशी आम्ही शिफारस करतो. भारतासारख्या देशात पदार्थांची विविधता आणि चव अफाट आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी कठोर बंधन घालता येत नाही. म्हणूनच आम्ही सांगतो की बॅड फूड – म्हणजे जरा चव घेण्यासाठी, मजेसाठी – ते १५ ते २० टक्केपर्यंत चालेल.”

“पण अग्ली फूड – म्हणजे अतिशय अपायकारक अन्नपदार्थ – हे शक्यतो टाळावं. गरज असेल तर केवळ २ ते ५ टक्केच घ्यावं,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. हा डाएट प्लॅन देवेंद्र फडणवीस यांनी काटेकोरपणे पाळला आणि त्याचा चांगला परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला, असंही डॉ. तोडकर यांनी सांगितलं.

 

Web Title: How did devendra fadnavis lose 25 kg dr jayashree todkar told the special formula

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 02:36 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
3

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
4

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.