अजित पवारांच्या कार्यक्रमात गोंधळ (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे दौऱ्यावर असताना शहरात त्यांचा एक कार्यक्रम सुरू होता. मात्र या कार्यक्रमात काहीसा गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पवारांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच
माजी आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरले आहेत. बच्चू कडू यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि सातबारा कोरा करण्याच्या मुद्यावरून आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांचे उपोषण सुरुच आहे. अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधी जवळ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. 16 जूनपासून त्यांनी पाणी देखील त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांच्या आंदोलनामुळे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
पुण्यात नेमके काय घडले?
पुण्यात अजित पवारांचा एक कार्यक्रम सुरू होता. यावेळी आमरावतीच्या शेतकऱ्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी घोषणाबाजी केली. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी अजित पवारांना जाब विचारलं असल्याचे समजते आहे.
bacchu kadu : प्रहारचे नेते बच्चू कडू यांचे आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरु; नेमकी मागणी तरी काय?
अन्नत्याग आंदोलनाला हर्षवर्धन सपकाळांनी दिला पाठिंबा
प्रहार संघटनेचे नेते व माजी मंत्री बच्चू कडू हे सध्या आंदोलन करत आहेत. बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन छेडले असून आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आणि सातबारा कोरा करण्याच्या मुद्यावरून आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. त्यांनी मागील पाच दिवसांपासून अन्नत्याग केला आहे. बच्चू कडू यांची मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली आहे. त्याचबरोबर शरद पवार यांनी देखील फोन केला होता. यानंतर बच्चू कडू यांना कॉंग्रेस पक्षाचा देखील पाठिंबा मिळाला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन माहिती दिली आहे.
प्रहारचे नेते बच्चू कडू यांना विविध संघटना व पक्षांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि दिव्यांगाच्य प्रश्नांसाठी त्यांनी केलेल्या या अन्नत्याग आंदोलनाला महाराष्ट्र कॉंग्रेसने पाठिंबा दिला आहे. याबाबत त्यांंनी सोशल मीडिया पोस्ट करुन त्यांची भूमिका मांडली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी लिहिले आहे की, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू कडू यांचे गुरुकुंज मोझरी येथे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. कडू यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे वास्तव आहे, शेतकरी आज मोठ्या संकटात आहे, शेतमालाला भाव नाही, राज्यात शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, सत्ताधा-यांनी निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे अगोदरच संकटात असलेला शेतकरी पूर्णपणे हताश आणि निराश झालेला आहे, अशी भूमिका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी घेतली आहे.