गोकुळ दूध संघाची गाडी वापरण्यास नकार देत नव्या अध्यक्षांचा मोठा निर्णय
Gokul chairman action : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या महिन्यात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकही चांगलीच अटीतटीची झाली.राजकीय वातावरणही चांगतलंच तापलं होतं. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आली.पण यानिवडणुकीनंतरही या प्रकरणात आणखी एक नवा वाद उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गोकुळ दूध संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी पदभार स्वीकारताच दूध संघातील ऐषआरामी परंपरेला छेद देणारा निर्णय घेतला आहे. नवीद मुश्रीफ यांनी गोकुळच्या अध्यक्षासाठी वापरण्यात येणारी अधिकृत गाडी न वापरण्याची स्पष्ट घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे गोकुळमधील आधीच्या व्यवस्थेबाबत पुन्हा दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. पूर्वी दूध संघाच्या सर्व संचालकांसाठी स्कॉर्पिओ गाड्या उपलब्ध करून दिल्या जात होत्या. त्या गाड्यांचा वापर आणि त्यावर होणारा खर्च हादेखील कायम चर्चेचा विषय राहिला.
Ajit Pawar Pune News: अजित पवारांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ; बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी थेट…
पण नवीद मुश्रीफ यांच्या या निर्णयामुळे गोकुळच्या अंतर्गत राजकारणातही पदसाद उमटू लगले आहेत. पहिल्याच मासिक बैठकीत त्यांनी घेतलेला हा निर्णय म्हणजे संघाच्या खर्चिक व्यवस्थेकडे पाठ फिरवण्याचं स्पष्ट संकेत असल्याचे बोलले जात आहे. गोकुळसारख्या मोठ्या सहकारी संस्थेचा कारभार पारदर्शक आणि सदस्यकेंद्रित व्हावा यासाठी अध्यक्ष मुश्रीफ यांनी दिलेला सुरूवातीच्या काळात दिलेला हा संदेश महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे भविष्यात संघाच्या कारभारात बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दूध संघाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी गोकुळच्या अध्यक्षांना दिली जाणारी गाडी वापरणार नसल्याची घोषणा केली. तसेच, पहिल्या मासिक बैठकीत त्यांनी अध्यक्षांसाठी वापरली जाणारी महागडी गाडी विकण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून तिची विक्री करण्याचा ठरावही मांडण्यात आला. “माझ्याकडे स्वतःची मोटार असल्याने मी ‘गोकुळ’ची संघाची गाडी वापरणे योग्य ठरणार नाही, त्यामुळे मी दूध संघाची मोटार न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. निविदा प्रक्रियेनुसार मोटारीची विक्री केली जाईल.
गेल्या काही वर्षात गोकूळच्या संचालकांना वापरण्यासाठी महागड्या गाड्या दिल्या जात होत्या. मात्र पाटल आणि मुश्रीफ यांच्या सत्तेत संचालक मंडळाने त्या गाड्या वापरण्यास नकार दिला. त्यानंतरही अध्यक्षांनीही गोकुळ संघाची गाडी वापण्यास नकार दिला. त्याची चर्चा आता गोकुळच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्याही राजकारणात होऊ लागली आहे.