Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिव्हर आतून पोखरून काढतो Hepatitis आजार, कसे ठेवाल Liver सुरक्षित

हेपेटायटिस हा आजार लिव्हरला लक्षणीयरीत्या कमकुवत करतो, म्हणून आपण आपल्या आहाराची काळजी घेणे महत्वाचे आहे जेणेकरून हा अवयव सुरक्षित राहील. पण याची कशी काळजी घ्यायची ते तज्ज्ञांनी सांगितले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 17, 2025 | 11:56 AM
हेपेटायटिसमुळे लिव्हरवर होणारे परिणाम

हेपेटायटिसमुळे लिव्हरवर होणारे परिणाम

Follow Us
Close
Follow Us:

हेपेटायटीस म्हणजे यकृताची जळजळ अर्थात लिव्हरमध्ये सतत जळजळ होत राहते. याचा अर्थ असा होतो की तुमचे लिव्हर निरोगी नाही आणि हे अनेक कारणांमुळे होऊ शकते. आजकाल सर्वात सामान्य कारणांपैकी एक म्हणजे दारू. नियमितपणे जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने अल्कोहोलिक हेपेटायटीस होऊ शकतो, जो वाढत्या प्रमाणात सामान्य होत आहे. म्हणून, अल्कोहोलसारख्या गोष्टींपासून पूर्णपणे दूर राहणे चांगले.

हेपेटायटिसचा लिव्हरवर नक्की काय परिणाम होऊ शकतो आणि कशा पद्धतीने लिव्हर सुरक्षित ठेवायला पाहिजे याबाबत डॉ. अमोल डहाळे, कन्स्लन्टंट गॅस्ट्रोअँट्रोलॉजिस्ट, डी. वाय. पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तुम्ही या लेखातून योग्य ती माहिती मिळवू शकता (फोटो सौजन्य – iStock) 

हेपेटायटिस होण्याचे कारण 

हेपेटायटिस नक्की कसा होतो

तज्ज्ञ गॅस्ट्रोअँट्रोलॉजिस्ट यांनी सांगितले की, डॉक्टरांना न विचारता ओव्हर-द-काउंटर (ओटीसी) औषधे घेणे हे हिपॅटायटीस होण्याचे एक कारण आहे. अनेक वेदनाशामक आणि इतर सामान्य औषधे जास्त प्रमाणात किंवा वारंवार घेतल्यास लिव्हरचे नुकसान करू शकतात. म्हणून, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. कोणत्याही आजारावर स्वतःच्या मनाने औषध घेणे हानिकारक ठरू शकते 

त्वचेला येतेय खाज आणि जाणवत असतील 5 संकेत, तर Liver सडून गंभीर आजार होण्याची शक्यता

लिव्हर एक सायलंट अवयव

यकृत आपल्या शरीरात अनेक महत्त्वाची कार्ये करते, परंतु जोपर्यंत त्याचा वाईट परिणाम होत नाही तोपर्यंत ते कोणतीही लक्षणे दाखवत नाही. म्हणून प्रतिबंध खूप महत्वाचा आहे. खूप उशीर होण्यापूर्वी तुमच्या यकृताची काळजी घ्या. सुज्ञ निर्णय घ्या, जागरूक रहा आणि निरोगी जीवन जगा. अनेकदा लिव्हरमध्ये होणारा त्रास हा अति झाल्याशिवाय जाणवत नाही आणि म्हणूनच याला सायलंट अवयव असं म्हटलं जातं. त्यामुळे लिव्हरची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि सावध राहणेही तितकेच आवश्यक आहे.

किडनी लिव्हर होईल डिटॉक्स! उपाशी पोटी नियमित करा पाण्याचे सेवन, शरीराला होतील कमालीचे फायदे

लिव्हर हेल्दी कसे ठेवाल

लिव्हर सुरक्षित राहण्यासाठी काय करावे

  • विशेषतः ऋतू बदलाच्या वेळी, खराब झालेले किंवा दूषित झालेले पदार्थ खाणे टाळा
  • नेहमी स्वच्छ आणि सुरक्षित पाणी प्या
  • तुमची चाचणी झाली नसली तरीही, हिपॅटायटीस बी ची लस घ्या
  • सतत दारू वा धुम्रपान करत असाल तर वेळीच स्वतःला आवर घाला
  • वयाच्या कोणत्याही टप्प्यात तुम्हाला हेपेटायटिस होऊ शकतो त्यामुळे हेल्दी खाणं जितकं अधिक खाता येईल त्याला प्राधान्य द्या 

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: How liver health affected by hepatitis disease expert gastroenterologist shared information

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 11:56 AM

Topics:  

  • Health News
  • hepatitis
  • Liver
  • liver care

संबंधित बातम्या

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान
1

International Medical Transport Day : आजच्या ‘या’ खास दिवशी केला जातो जीव वाचवणाऱ्या अज्ञात नायकांचा सन्मान

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध
2

World Mosquito Day : 2025 मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत
3

CM Relief Fund: रुग्णांसाठी सरकारचा ‘हा’ विभाग ठरतोय मदतशीर; अमरावती विभागात तब्बल १०.६१ कोटींची मदत

Liver Detox: लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीर होईल स्वच्छ
4

Liver Detox: लिव्हरमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीर होईल स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.