Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कापलेलं केळं किती वेळात खायला हवं? काळं पडलेलं केळं खाणं सुरक्षित असतं का? जाणून घ्या सविस्तर

Banana Tips : केळी कापून ठेवल्यानंतर काही वेळाने ती काळी पडतात, अशा परिस्थितीत काळ्या केळींचे सेवन करावे की नाही याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतात. चला याचं उत्तर जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: May 09, 2026 | 08:15 PM
कापलेलं केळं किती वेळात खायला हवं? काळं पडलेलं केळं खाणं सुरक्षित असतं का? जाणून घ्या सविस्तर

कापलेलं केळं किती वेळात खायला हवं? काळं पडलेलं केळं खाणं सुरक्षित असतं का? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • कापलेले केळे जास्त वेळ बाहेर ठेवल्यास त्याचा रंग बदलू शकतो आणि चवही कमी होऊ शकते.
  • केळ्यावर दिसणारे काळे डाग नेहमीच ते खराब झाल्याचे संकेत नसतात.
  • तज्ज्ञांच्या मते, फळे ताजी असतानाच खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.
फळांचे सेवन आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. केळं हे एक असं फळ आहे जे वर्षभर कोणत्याही सीजनमध्ये आपल्याला बाजारात सहज उपलब्ध मिळतं. हे हंगामी फळ नाही ज्यामुळे कधीही तुम्ही याचे सेवन करु शकता. दुसरं कारण म्हणजे केळी फार कमी किमतीला विकली जातात ज्यामुळे अधिकतर लोक याचे सेवन करणे पसंत करतात. उपवासातही केळी मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात किंवा पूजेलाही केळी ठेवली जातात.

८६ वर्षीय महिलेवर हिप फ्रॅक्चर शस्त्रक्रिया यशस्वी! गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या एका दिवसात चालण्यास सुरुवात

प्रत्येक फळामध्ये आरोग्यदायी पोषक घटक आढळून येतात जे आपल्या आरोग्याला फायदे मिळवून देऊ शकतात. केळ्यांमध्येही फायबर आणि जीवनसत्त्वांचा चांगला साठा आढळून येतो. याचे सेवन पचन सुधारते, हृदयाचे आरोग्य आणि त्वरित ऊर्जा मिळवून देण्यात मदत करते. आता तुम्ही कधी ही गोष्ट लक्षात घेतली आहे का? जेव्हा आपण केळी कापून फार काळ बाहेर ठेवतो तेव्हा त्यांचा रंग हलका काळा होऊ लागतो. पांढऱ्या रंगाची केळी अचानक काळी पडल्याने याचे सेवन आरोग्यासाठी चांगले आहे की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम तयार होतो आणि म्हणूनच याचे उत्तर आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

अनेकदा कापून ठेवलेली किंवा फार दिवसांपासून घरात आणून ठेवलेली केळी काळे रुप धारण करते. यामागचे कारण म्हणजे त्यावर होत असलेली ऑक्सिडाइज प्रक्रिया. यामुळे कापेलेली केळी लवकर काळी होतात. तज्ञांच्या मते, कापलेल्या केळ्यांना फार काळ बाहेर न ठेवता लगेच त्यांचे सेवन करावे. केळी कापून खाण्यासाठी नसतात. ती सोलून लगेच खावीत.

काळे पडलेले केळे वाईट असते का?

जर तुम्ही सोलून किंवा कापून केळ फार काळ बाहेर ठेवले असेल आणि ते यामुळे काळे पडले असेल तर याचे सेवन करु नका. तथापि, केळे न सोलताच त्यावर काळे डाग दिसत असतील, तर ते केळे खराब नसून जास्त पिकलेले असते. केळे जास्त पिकल्यावर त्याची साल वरून काळी पडू लागते. असे केळे आतून खराब झालेले नसते. केळ्याची साल काळी पडण्याचे किंवा त्यावर डाग पडण्याचे कारण म्हणजे त्यातील TNF चे वाढलेले प्रमाण. अशा केळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते. लक्षात घ्या, पूर्ण पिकलेली केळी पोटाच्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. त्यामुळे आधीपासून केळ्याची साल काळी पडली असेल तर अशा केळ्यांना खाणं नुकसानदायी ठरत नाही.

गॅस किंवा पाळीचा त्रास समजून दुर्लक्ष करणाऱ्या वेदना असू शकतात कँसरचा धोका, डॉक्टरांचा महिलांना इशारा

कापलेली फळे किती वेळाने खावीत?

साधारणत: केळ्यांना विनाकारण कापून फार काळ बाहेर ठेवूच नका, तर त्यांचे लगेच सेवन करा. जास्त काळ बाहेर कापून ठेवलेल्या फळांची चव कमी होते. हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. उन्हाळ्यात कापलेली फळे खाणे विशेषतः टाळावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: How long can cut banana be safe to eat lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • banana benefits
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा
1

वय राहिलं फक्त एक नंबर! चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या होतील दूर, त्वचाही होईल मऊ; फक्त ही 1 गोष्ट वापरा

सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय हटवायचे असतात? मग या घरगुती पद्धतीचा वापर करा
2

सिल्क आणि बनारसी साडीवरील डाग ड्रायक्लिनिंगशिवाय हटवायचे असतात? मग या घरगुती पद्धतीचा वापर करा

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध
3

History Of High Heels: हाय हिल्सचा इतिहास, कधी लागला शोध

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत
4

Weight Loss Tips : १० दिवसांत करा ५ किलो वजन कमी, डाॅ.उपासना यांनी शेअर केला खास डाएट प्लॅन; बेली फॅट कमी करण्यास करेल मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.