मूल होण्यासाठी किती शुक्राणू आवश्यक (फोटो सौजन्य - iStock)
कोणत्याही जोडप्याच्या आयुष्यातील मुलं होण्याचा आनंद हा एक खास आणि महत्त्वाचा अनुभव असतो. पण जेव्हा गर्भधारणेला विलंब होतो किंवा वारंवार प्रयत्न अयशस्वी होतात तेव्हा बहुतेकदा महिला प्रथम डॉक्टरकडे जातात. तथापि, प्रजनन क्षमता केवळ महिलांपुरती मर्यादित नसते, पुरुषांमधील शुक्राणूंची अर्थात स्पर्म्सची संख्या आणि गुणवत्तादेखील मुले होण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
अनेकदा प्रश्न पडतो की, मूल जन्माला येण्यासाठी पुरुषाकडे किती Sperm Count असायला हवा आणि जर ती संख्या कमी असेल तर ती कशी तपासता येईल आणि सुधारता येईल? शुक्राणूंची संख्या म्हणजे पुरुषाच्या स्खलनात असलेल्या शुक्राणूंची संख्या. ते सहसा प्रति मिलीलीटर वीर्य मोजले जाते. जास्त शुक्राणूंची संख्या असल्याने गर्भधारणेची शक्यता वाढते, तर कमी शुक्राणूंची संख्या पुनरुत्पादनास अडथळा आणू शकते (फोटो सौजन्य – iStock)
किमान Sperm Count किती असावे?
गायनॉकॉलॉजिस्ट डॉ. सुनील जिंदाल यांनी स्पष्ट केले की निरोगी पुरुषाकडे प्रति मिलीलीटर १५ दशलक्ष शुक्राणूंपेक्षा जास्त आणि एकूण ३९ दशलक्षपेक्षा कमी नसावेत. जर संख्या यापेक्षा कमी असेल तर मूल होण्यात अडचण येऊ शकते. परंतु गर्भधारणेत केवळ संख्याच नाही तर शुक्राणूंची गती, आकार आणि गुणवत्तादेखील महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा तुम्ही मुलांचा विचार करता तेव्हा अर्थात स्पर्म काऊंट अत्यंत गरजेचे आहे आणि हल्ली पुरुषांमध्ये याची गुणवत्ता आणि संख्या दोन्ही कमी दिसून येते. त्याचीही कारणेही अनेक आहेत. अनेकदा महिलांमुळेच नाही तर पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट कमी असल्याने मूल होत नसल्याचे तपासणीत समोर येत असलेले दिसून येत आहे.
स्पर्म फ्रिझींग म्हणजे नेमकं काय? कशी आहे प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर
शुक्राणूंची संख्या कशी तपासायची?
शुक्राणूंची संख्या वाढवण्याचे उपाय
जर एखाद्या पुरुषात शुक्राणूंची संख्या कमी असेल तर त्याने आम्ही खाली सांगितलेले उपाय अवलंबावेत. यामध्ये कोणतेही त्रास होत नाही. आपल्या आहारात आणि रोजच्या सवयींमध्ये योग्य बदल करावा लागेल. त्यासाठी तुम्ही आहारामध्ये आणि सवयींमध्ये नेमका कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा ते आपण जाणून घेऊया
जर तुम्ही मूल जन्माला घालण्याची योजना आखत असाल तर पुरूषाची प्रजनन क्षमता तपासणे हे स्त्रीइतकेच महत्त्वाचे आहे. कमी शुक्राणूंची संख्या ही एक सामान्य समस्या आहे, परंतु योग्य चाचणी, जीवनशैलीतील बदल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ती सुधारता येते.
पुरुषहो! 5 गोष्टींमुळे होतोय Sperm Count कमी, तुम्ही तर ‘ही’ चूक करत नाही ना?