Low Sperm Count Symptoms: पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या सतत कमी होत आहे. जेव्हा हे पुरुषासोबत होते तेव्हा त्याची लक्षणे शरीरावर दिसून येतात. कोणते पदार्थ खाल्ल्याने शुक्राणू कमी होतात. आजकाल, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे, पुरुष आणि महिला दोघांमध्येही वंध्यत्वाची समस्या उद्भवत आहे. हेच कारण आहे की जोडप्यांना पालक होण्याचा आनंद घेता येत नाही. आजकाल पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या गंभीर होत चालली आहे. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते किंवा शुक्राणूंची कमतरता असते. पुरुषांमध्ये नक्की स्पर्म काऊंट कमी का होतोय याची अनेक कारणं आहेत त्यापैकी खाण्यापिण्याच्या पद्धतीीतल तफावत हेदेखील आहे. कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे पुरुषांमधील शुक्राणू कमी होतात याबाबत अधिक माहिती घेऊया (फोटो सौजन्य - iStock)
एका संशोधनातून याबाबत एक धक्कादायक गोष्टही समोर आली आहे. 'ह्यूमन रिप्रोडक्शन अपडेट' या जर्नलमधील एका अहवालानुसार, गेल्या ४५ वर्षांत पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या निम्म्याहून अधिक कमी झाली आहे
येत्या काळात ते आणखी घसरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे, जे चिंतेचा विषय आहे. याची एकच नाही तर अनेक कारणे असू शकतात. काही आजार देखील यासाठी जबाबदार असू शकतात. अशा परिस्थितीत, कोणत्या आजारामुळे शुक्राणूंची संख्या कमी होत आहे ते जाणून घेऊया
अंतःस्रावी विकार निर्माण करणारी रसायने अन्न आणि हवेद्वारे शरीरात प्रवेश करतात; ज्यांचे जास्त प्रमाण इतर संप्रेरकांवर परिणाम करते
लठ्ठपणा आणि अयोग्य आहार हे देखील याचे एक कारण आहे. जास्त धूम्रपान आणि मद्यपान यामुळे देखील प्रजनन समस्या उद्भवतात
जेव्हा पुरुषांच्या शरीरातील सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन असंतुलित होतो, तेव्हा शुक्राणूंची संख्या कमी होते हेदेखील एक कारण आहे
शुक्राणूंचा अनुवांशिक आजार, गुप्तांगाचा संसर्ग, लैंगिक आजार गोनोरिया यामुळे देखील शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते