मूल जन्माला घालण्यासाठी वयाची अट ही केवळ महिलांनाच असते असा गैरसमज समाजात दिसून येतो. वास्तविक पाहता तुमच्या वयानुसार पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तादेखील कमी होत जाते. शुक्राणू गोठवणे पुरुषाची प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यास फायदेशीर ठरते. जेणेकरून इच्छेनुसार त्याला कुटुंब नियोजन करता येईल आणि मुल जन्माला घालू शकेल. शिवाय स्पर्म फ्रिजींगचा वापर शुक्राणू साठवण्यासाठी देखील केला जातो म्हणून त्याचा वापर उपचाराकरिता केला जाऊ शकतो.
महिलांप्रमाणेच एग फ्रीझिंगचा पर्याय पुरुषांकरितादेखील उपलब्ध आहे. पुरुषांना त्यांचे शुक्राणू भविष्यात वापरण्यासाठी स्पर्म फ्रिझींग (पुढच्या आयुष्यात पितृत्व स्वीकारणे) किंवा इतर कोणाच्या तरी उपचारासाठी स्पर्म डोनेट करणे गरजेचे आहे. स्पर्म डोनेट केल्यानंतर, शुक्राणूंना 4 ते 7 महिन्यांपेक्षा जास्त काळ वेगळे केले जाईल आणि प्राप्तकर्त्याद्वारे संक्रमण होण्यापूर्वी त्याचे परीक्षण केले जाईल.
आयसोलेशन प्रक्रियेची लांबी डॉक्टरांनी केलेल्या स्क्रीनिंग चाचण्यांच्या प्रकारावर आधारित आहे. याबाबत अधिक माहिती दिली आहे, डॉ. भारती ढोरेपाटील, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, पुणे यांनी. (फोटो सौजन्य – iStock)
शुक्राणू गोठवण्याची निवड कोणी करावी?
ज्यांना कोणत्याही आरोग्याच्या समस्या आहेत किंवा जे कर्करोगासारखे वैद्यकीय उपचार घेत आहेत, ज्यांना प्रजननक्षमतेवर परिणाम होतो, ज्यांची शुक्राणूंची संख्या कमी आहे किंवा तुमच्या शुक्राणूंची गुणवत्ता खालावत आहे त्यांच्यासाठी स्पर्म फ्रिझींगचा पर्याय उपलब्ध आहे. आयव्हीएफ उपचार, प्रजनन उपचाराच्या दिवशी शुक्राणूचा तयार करण्यात अडचण आल्यास शुक्राणू गोठवण्याचा पर्याय निवडता येतो.
[read_also content=”पुरूषांच्या शुक्राणू गुणवत्तेत झपाट्याने घट, कसे मोजावे https://www.navarashtra.com/lifestyle/rapid-decline-in-mens-sperm-quality-what-are-the-reasons-home-sperm-screening-is-preferred-nrps-386221/”]
शुक्राणू गोठवण्याच्या प्रक्रियेबद्दल जाणून घ्या
ही प्रक्रिया अत्यंत सुरक्षित आहे आणि भविष्यात बाबा होऊ इच्छिणाऱ्या पुरुषांकरिता फायदेशीर ठरते.पितृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुरुषांकरिता एग फ्रिजींगची निवड करणे ही काळाची गरज आहे.
[read_also content=”गुलाब वाढवते शुक्राणू, कसे ते जाणून घ्या https://www.navarashtra.com/india/roses-increase-sperm-these-flowers-improve-the-fertility-of-both-males-and-females-236803/”]
स्पर्म फ्रिझींगसाठी किती खर्च येतो?
भारतात शुक्राणू गोठवण्याची सरासरी किंमत रु. 20,000 ते 50,000 च्या दरम्यान असू शकते. ही प्रजननक्षमता संरक्षणासाठी अंदाजे खर्चाची श्रेणी आहे, तथापि, विशेषतः क्रायोप्रिझर्वेशनसाठी वार्षिक आधारावर जोडले जाणारे अतिरिक्त शुल्क यामध्ये समाविष्ट नाही. तसंच वेगवेगळ्या हॉस्पिटलनुसार याचा खर्च बदलू शकतो. तुम्हाला तुमचे स्पर्म्स गोठवायचे असतील तर साधारणतः तुमच्या खिशात 50 हजारपर्यंत रक्कम असायला हवी.