Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gardening Tips : मोगऱ्याचं झाड फुलांनी बहरवायचंय? घरच्या घरी कचऱ्यापासून तयार करा नैसर्गिक द्रावण

मोगऱ्याच्या झाडाला भरपूर कळ्या आणि फुले यावीत यासाठी महागडी रासायनिक खते वापरण्याची गरज नाही. घरातील टाकाऊ वस्तू आणि योग्य निगा राखूनही झाडाचा बहर वाढवता येतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 31, 2026 | 08:15 PM
Gardening Tips : मोगऱ्याचं झाड फुलांनी बहरवायचंय? घरच्या घरी कचऱ्यापासून तयार करा नैसर्गिक द्रावण

Gardening Tips : मोगऱ्याचं झाड फुलांनी बहरवायचंय? घरच्या घरी कचऱ्यापासून तयार करा नैसर्गिक द्रावण

Follow Us
Follow Us:
  • घरातील टाकाऊ वस्तूपासून नैसर्गिक द्रव खत तयार करून मोगऱ्याच्या झाडाची वाढ आणि फुलोरा वाढवता येतो.
  • झाडाची नियमित छाटणी केल्याने नवीन फांद्या, कळ्या आणि फुले येण्यास मदत होते.
  • पुरेसा सूर्यप्रकाश आणि वेळोवेळी सेंद्रिय खत दिल्यास झाड निरोगी राहून अधिक फुलते.
मोगऱ्याची फुले अनेकांना फार आवडतात. घराची शोभा वाढवण्यासाठी अनेकदा घराच्या बाल्कनीत सुंदर फुलांची झाडे लावली जातात. यात प्रामुख्याने मोगऱ्याच्या फुलांचाही समावेश होतो. मोगऱ्याचा सुगंध आणि यांचा गडद पांढरा रंग मनाला शांती देऊन जातो. आता फुले कुंडीत लावण तर फार सोपं आहे पण यात फुलं येणं तितक सोपं नाही. बऱ्याचदा लोक आवडीने कुंडीत फुलांचे रोप लावतात खरं पण योग्य काळजी आणि खत न घातल्याने कुंडीतच ते झाड मरुन जात किंवा झाडाला फुल येत नाहीत. तुम्हालाही ही समस्या उद्भवत असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरेल. कुंडी फुलांनी भरण्यासाठी रासायनिक फर्टिलाइजर खरेदी करण्याची गरज नाही तर सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही घरीच प्रभावी असे खत तयार करु शकता. हे खत फुलांची वाढ होण्यास आणि कुंडीत फुले येण्यास मदत करेल.

मसुरी ट्रिपमध्ये ‘झरीपानी कॅसल’ला नक्की भेट द्या; यालाच म्हणतात खरं ‘मुसाफिर कॅफे’

कांद्याच्या सालींचा वापर

अनेकांना हे ठाऊक नाही पण कुंडीत कांद्याच्या साली टाकून झाडांची वाढ केली जाऊ शकते. स्वयंपाकघरातील कचऱ्यापासून म्हणजेच कांद्याच्या सालींपासून तयार केलेले द्रव खत झाडाला आवश्यक पोटॅशियम आणि नायट्रोजन पुरवते. हे द्रावण झाडांमध्ये टाकल्याने अवघ्या काही दिवसांमध्येच झाडांवर कळ्या येण्यास सुरुवात होते.

वेळोवेळी छाटणी करा

झाडाची योग्य रितीने वाढ होण्यासाठी पानांची वेळोवेळी छाटणी होणे फार गरजेचे असते. याला प्रूनिंग असं म्हटलं जातं. मोगऱ्याच्या झाडाची छाटणी केल्याने झाड वेगाने आणि योग्य रितीने वाढण्यास मदत होते. यामुळे नव्या फांद्या, फुले आणि कळ्या येण्यास मदत होते. झाडाची वाढ जर अस्थिर होत असेल तर त्याची छाटणी करणे अनिवार्य ठरते.

सूर्यप्रकाश आणि शेणखत

कोणत्याही झाडाची वाढ होण्यासाठी त्याला सूर्यप्रकाशात ठेवणे गरजेचे असते. मोगऱ्याच्या झाडाला दिवसभर सूर्यप्रकाशात ठेवा. तसेच दर १५-२० दिवसांनी यात गांडूळ खत किंवा शेणखत घाला, यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होते.

कांद्याच्या सालींचा वापर

मोगऱ्याच्या झाडावर असंख्य कळ्या हव्या असतील तर यात लिक्विड फर्टिलाइजरचा वापर करणे महत्त्वाचे ठरु शकते. हे लिक्विड फर्टिलाइजर तुम्ही कांद्याच्या सुक्या सालींपासून तयार करु शकता. कांद्याच्या सालींमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात, ही सर्व पोषक तत्वे वनस्पतीच्या फुलोऱ्यासाठी आवश्यक आहेत.

Gardening Tips : कुंडीत लिंबाचं रोप लावलंय? ही फ्री ट्रिक वापरा, लिंबांनी बहरून जाईल झाड

कांद्याच्या सालींपासून खत कसे तयार करायचे?

हे खत तयार करण्यासाठी स्वयंपाकघरातून कांद्याच्या सुक्या साली गोळ्या करा. या सालींना काही वाडग्यात जमा करुन साली बुडतील इतकं पाणी त्यात घाला. साधारण आठवडाभर या साली पाण्यात भिजवून ठेवा. पाण्याचा रंग यानंतर काहीसा गुलाबी झाल्याचा तुम्हाला दिसेल. ७ दिवसांनंतर यापासून लिक्विड फर्टिलाइजर तयार होते. यानंतर हे पाणी गाळून घ्या. लक्षात घ्या हे पाणी तुम्हाला डायरेक्ट कुंडीत घालायचे नाही आहे. अर्धा ग्लास लिक्विड फर्टिलाइजर १ लीटर पाण्यात मिक्स करा आणि मग हे पाणी कुंडीत घाला. महिनातून १-२ वेळा तुम्ही हे द्रावण कुंडीत घालू शकता. याच्या मदतीने झाडाची चांगली वाढ होईल आणि कुंडी मोगऱ्याची फुलांनी भरुन जाईल.

Web Title: How to grow more jasmine flowers onion peel liquid fertilizer gardening tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • gardening tips
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज
1

HIV: काय आहे अँटीरिट्रोव्हायरल थेरपी? HIV सह अधिक काळ जगताना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर
2

Diabetes: भात, बटाटे अन् पक्वान्ने वर्ज्य? जाणून घ्या मधुमेहातील आहाराचा खरा ‘गोडवा’, वाचा सविस्तर

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?
3

Neck Cancer: मानेच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुजलेल्या लिम्फ नोड्स म्हणजे काय?

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत
4

Gold Jewellery Cleaning At Home: घरच्या घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्याची सोपी पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.