(फोटो सौजन्य: istock)
Beauty Tips : त्वचेवर सर्वात आधी फेस क्रिम लावावी की सनस्क्रिन? बहुतेक जण इथेच करतात मोठी चूक
या ट्रिकसाठी तुम्हाला कोणत्याही बाजारातून केमिकलयुक्त खत खरेदी करण्याची आवश्यकता नाही, तुम्ही फक्त स्वयंपाकघरातील दोन चमचे दही किंवा ताकापासून एक द्रावण तयार करु शकता. याच्या मदतीने कुंडीत लिंबाचं हिरवगार झाड उगवण्यासाठी मोठी मदत होईल. चला याचा वापर कुंडीत कसा करावा याची माहिती घेऊया.
लिंबाच्या बियांपासून हिरवगार झाड उगवा
जर तुम्ही लिंबाचे झाड घरीच उगवण्याचा विचार करत असाल तर लिंबाच्या बियांचा वापर तुमच्यासाठी परफेक्ट ठरु शकतो. कुंडीतील सुपीक मातीत बिया पेरा आणि त्याला हलक पाणी घाला. योग्य रितीने झाडाची काळजी घेतल्यास वर्षभरातच कुंडीत फुले येण्यास सुरुवात होईल. एकदा का फुले आली की लिंबाचे फळ येण्यासही सुरुवात होईल.
फुल आणि फळांची वाढ
वर्षभरात झाडाची योग्य काळजी घेतली की झाडाला सफेद रंगाचे फूल येऊ लागते. हे फूल म्हणजे एक संकेत आहे की लवकरच झाडाला फळ लागणार आहे. हळूहळू याच फुलांतून लहान-लहान लिंबाचे फळ उगवायला सुरुवात होते.
सीक्रेट फर्टिलाइझर
लिंबाच्या झाडावर जर तुम्हाला भरगच्च लिंबू यायला हवे असतील तर यासाठी तुम्ही ताकाचा वापर करु शकता. यामध्ये उपलब्ध असलेले पोषकतत्व आणि गुड बॅक्टेरिया मातीच्या गुणवत्तेला सुधारण्याचे काम करते. यामुळे रोपाची चांगली वाढ होते.
दहीचा वापर
जर तुमच्याकडे ताक उपलब्ध नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. २ चमचे दही आणि एक ग्लास पाणी एकत्रित मिसळून तुम्ही यापासून ताक तयार करु शकता. हे मिश्रण देखील मातीला योग्य आम्लता आणि पोषण पुरवण्यास मदत करते.
मुळांमध्ये करा वापर
तयार ताकाचे मिश्रण झाडाच्या पानांवर नाही तर मातीत हळूहळू घाला. हे द्रावण झाडाच्या मुळांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. असं केल्याने, झाडांची मुळे सर्व पोषण शोषूण घेतात ज्यामुळे झाडाची वाढ होण्यास मदत होते. यामुळे नवीन फुले आणि फळे तयार होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वेगवान होते.






