Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दर्याची सुकी दौलत! घरी बनवा आगरी कोळी स्टाईल ‘सुका जवळा’, रेसिपी आहे फार सोपी

तुम्हीही अजूनपर्यंत सुक्या जवळ्याची रेसिपी ट्राय केली नसेल तर तुम्ही खूप काही मिस करत आहात. कांदा आणि मसाल्यांवर खमंग शिजवलेला हा जवळा नॉनव्हेज प्रेमींना भारीच खुश करून जातो. चला याची पारंपारिक रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 15, 2026 | 09:35 AM
दर्याची सुकी दौलत! घरी बनवा आगरी कोळी स्टाईल ‘सुका जवळा’, रेसिपी आहे फार सोपी

दर्याची सुकी दौलत! घरी बनवा आगरी कोळी स्टाईल ‘सुका जवळा’, रेसिपी आहे फार सोपी

Follow Us
Follow Us:
  • सुका जवळा हा नाश्त्यात खाल्ला जाणारा कोळी लोकांचा फेव्हरेट पदार्थ.
  • जवळा म्हणजे बारीक कोळंबी जिला सुकवून अनेक महिने साठवून ठेवले जाते.
  • याची मसालेदार आणि खमंग चव तांदळाच्या भाकरीसोबत जेव्हा खाल्ली जाते तेव्हा मनातून फक्त प्रशंसा बाहेर पडते.
कोकण किनारपट्टीवर राहणाऱ्या आगरी आणि कोळी समाजाच्या स्वयंपाकात समुद्राची चव, मसाल्यांचा दरवळ आणि साधेपणा यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. समुद्रातून ताजे मासे, कोळंबी, बोंबील, जवला हे त्यांच्या दैनंदिन आहाराचे अविभाज्य घटक आहेत. याच परंपरेतून जन्माला आलेली एक खास आणि खमंग भाजी म्हणजे आगरी कोळी स्टाईल सुका जवला.

रात्रीच्या जेवणाला अशाप्रकारे बनवा मसालेदार अन् खमंग ‘भरलेलं कारलं’, चव अशी की कडू पदार्थाचेही फॅन व्हाल

जवला म्हणजे लहान लहान कोळंबी, ज्या वाळवून ठेवल्या की त्या अधिकच चविष्ट होतात. सुका जवला हा पदार्थ कमी साहित्यांत, पण भरपूर चवीत बनतो. लाल तिखट, कांदा, कोथिंबीर आणि कोकणी मसाल्याचा हलका स्पर्श यामुळे या भाजीला अप्रतिम झणझणीत स्वाद मिळतो. भाकरी, ज्वारी-भाजरीची भाकरी किंवा गरम भातासोबत सुका जवला खाल्ला की कोकणाची आठवण हमखास येते. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत ही भाजी विशेष आवडीने खाल्ली जाते. चला तर मग, घरच्या घरी बनवूया पारंपरिक आगरी कोळी स्टाईल सुका जवला कसा बनवायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

 साहित्य

  • सुका जवला – 1 वाटी
  • कांदा (बारीक चिरलेला) – 1 मध्यम
  • हिरवी मिरची (चिरलेली) – 1 ते 2
  • लाल तिखट – 1 चमचा
  • गरम मसाला – 1/2 चमचा
  • हळद – ½ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 2 चमचे
  • कोथिंबीर – थोडीशी
वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा हाय प्रोटीन ‘बाजरी मुंगलेट’, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात
कृती 
  • सर्वप्रथम सुका जवला कोमट पाण्यात 5–7 मिनिटे भिजवा. नंतर पाणी काढून हलक्या हाताने पिळून घ्या.
  • कढई तापली की त्यात तेल टाका.
  • आता त्यात चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून कांदा मऊ आणि गुलाबी होईपर्यंत परतावा.
  • हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून मसाला तेल सुटेपर्यंत नीट परता.
  • तयार केलेला जवला आणि हलकं पाणी कढईत टाकून मध्यम आचेवर चांगला परता.
  • जवला कोरडा आणि खमंग होईपर्यंत 5–7 मिनिटे परतत राहा.
  • शेवटी वरून कोथिंबीर घालून गरमागरम सुका जवला तयार.
  • हा सुका जवला तांदळाची भाकरी किंवा चपातीसोबत खाल्ला जातो.
  • तुम्ही यात कांद्याची पात किंवा वांग्याचे तुकडेही घालू शकता.

Web Title: How to make aagri koli style suka javla at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
1

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
4

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.