वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा हाय प्रोटीन 'बाजरी मुंगलेट'
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळे डाएट तर कधी तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम केला जातो. याशिवाय अनेक लोक सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचे जेवण करणे टाळतात. पण चुकीच्या पद्धतीने डाएट फॉलो केल्यास वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत जाते. जास्त उपाशी राहिल्यामुळे वजनावर कोणताही परिणाम दिसून येत नाही. याउलट शरीरात थकवा आणि अशक्तपणा वाढून आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतात. त्यामुळे वाढलेले वजन योग्य डाएट करून कमी करावे. सकाळच्या नाश्त्यात पोट जास्त भरलेले राहील अशा पदार्थांचे सेवन केल्यास वाढलेले वजन नियंत्रणात राहील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी बाजरी मुंगलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. बाजरीमध्ये असलेले भरपूर फायबर खाल्लेले सहज पचन करण्यासोबतच प्रोटीन वाढवण्यास मदत करतात. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा सकाळच्या नाश्त्यात , रात्रीच्या जेवणात बाजरीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. बाजरीमध्ये असलेले पोषक घटक रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. चला तर जाणून घेऊया बाजरी मुंगलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






