Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा Achaari Paneer Tikka Paratha, पदार्थ पाहून मुलं होतील खुश

संध्याकाळच्या वेळी नाश्त्यात तुम्ही आचारी पनीर टिक्का पराठा बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप आवडते. जाणून घेऊया पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 04, 2025 | 03:00 PM
संध्याकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा Achaari Paneer Tikka Paratha

संध्याकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी झटपट बनवा Achaari Paneer Tikka Paratha

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना नाश्त्यात नेहमीच काय द्यावं? असा प्रश्न पालकांना नेहमीच पडतो. नाश्त्यामध्ये मुलं सतत बाहेर विकत मिळणारे पिझ्झा, बर्गर किंवा इतर तेलकट पदार्थ खाण्यास मागतात. मात्र नेहमीच तेलकट तिखट पदार्थ खाणे लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. सतत जंक फूडचे सेवन केल्यामुळे मुलांचा सर्वंगीण विकास होत नाही. शरीराला योग्य पोषण न मिळाल्यामुळे वाढत्या वयात आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लहान मुलांसाठी आचारी पनीर टिक्का पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नेहमीच नाश्त्यात मैद्याचे पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर झटपट तुम्ही पराठा बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप आवडते. पनीर आरोग्यासाठी पौष्टिक आहे. चला तर जाणून घेऊया आचारी पनीर टिक्का पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

सर्दी खोकला होईल कमी! पावसाळ्यात झटपट घरी बनवा क्रिम गार्लिक मशरूम सूप, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पनीर
  • लाल तिखट
  • मीठ
  • शिमला मिरची
  • कांदा
  • दही
  • सातू पावडर
  • आलं लसूण पेस्ट
  • हिरवी मिरची
  • जिऱ्याची पावडर
  • गरम मसाला
  • कोथिंबीर
  • लोणचं मसाला
  • बटर
कुरकुरीत टिक्की, मऊ बन, आवडीच्या भाज्या अन् सॉस; घरी बनवा मार्केट स्टाईल टेस्टी Veg Burger

कृती:

  • आचारी पनीर पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या बाऊलमध्ये शिमला मिरची, कांदा आणि पनीरचे बारीक तुकडे करून घ्या.
  • मिश्रण तयार करताना सगळ्यात आधी दही घेऊन त्यात लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, जिऱ्याची पावडर, चाट मसाला, लोणचं मसाला घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात बारीक करून घेतलेल्या भाज्या टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • पॅनमध्ये बटर घालून तयार केलेले पनीर दोन्ही बाजूने भाजून घ्या. पनीर आणि भाज्या जास्त भाजू नये.
  • चपाती घेऊन त्यावर सॉस लावून पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर भाजून घेतलेला पनीर टिक्का आणि भाज्यांचे तुकडे पसरवून घ्या.
  • त्यानंतर वरून बारीक चिरून घेतलेला कांदा आणि चीज पसरवून घ्या. तयार केलेला पराठा फोल्ड करून सॅण्डविच मेकरमध्ये टोस्ट करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला आचारी पनीर टिक्का पराठा.

Web Title: How to make achaari paneer tikka paratha at home simple food recipe paneer recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी
1

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी
3

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
4

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.