
महिलांच्या शरीरासाठी वरदान ठरेल खारीक बदामाची खीर
वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. मासिक पाळीच्या समस्या, हाडांमधील वेदना, हार्मोन्सचे असंतुलन, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींमुळे महिलांचे आरोग्य काहीसे बिघडून जाते. त्यामुळे वाढत्या वयात शरीराची जास्त काळजी घ्यावी. कामाच्या घाईगडबडीमध्ये महिला कायमच स्वतःच्या आरोग्याची जास्त काळजी घेत नाहीत. पण पुरुषांपेक्षा महिलांना आरामाची जास्त आवश्यकता असते. हाडांमध्ये वाढलेल्या वेदना आणि हार्मोनल असंतुलनामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवांमध्ये वेदना, अचानक मूड बदलणे, सतत चिडचिड इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये खारीक बदामाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बदाम आणि खारीक महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतात. सुकवलेल्या खजूरमध्ये नैसर्गिक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज मुबलक प्रमाणात आढळून येते, ज्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते. याशिवाय कॅल्शियम आणि फॉस्फरस शरीरातील सर्वच हाडे मजबूत ठेवतात. चला तर जाणून घेऊया बदाम खारीक खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
साध्या चवीत दडलाय आनंद; बिर्याणीच दुसरं व्हर्जन ‘कुस्का राईस’ कधी खाल्ला आहे का? जाणून घ्या रेसिपी