
डाळभात म्हणजे पचनासाठी अतिशय हलका पदार्थ! पारंपरिक पद्धतीमध्ये घरी बनवा गोडआंबट चवीचे वरण
पारंपरिक पदार्थांच्या यादीमध्ये कायमच डाळभाताचे नाव घेतले जाते. डाळभात हा पदार्थ अनेकांचे कम्फर्ट फूड आहे. भूक लागल्यानंतर किंवा रात्रीच्या जेवणात कायमच डाळभात बनवला जातो. तुरीच्या डाळीला चटकदार तिखट फोडणी देऊन डाळ बनवली जाते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गोडी डाळ खायला खूप जास्त आवडते. मात्र आज आम्ही तुम्हाला साध्या डाळीला हटके फोडणी देऊन आंबटगोड वरण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली डाळ तुम्ही गरमागरम भाकरी, चपाती किंवा वाफाळत्या भातासोबत सुद्धा खाऊ शकता. कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात डाळ तयार होते. रात्रीच्या जेवणात आंबटगोड डाळ बनवल्यास सहज पचन होईल.सहज पचन होणाऱ्या पदार्थांमध्ये कायमच डाळीचे नाव घेतले जाते. चला तर जाणून घेऊया आंबटगोड डाळ बनवण्याची कृती. (फोटो सौजन्य – istock)
Recipe : हिवाळ्याच्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करा, संपूर्ण कुटुंबासाठी बनवा आलं-हळदीचं हे दूध!