संध्याकाळ होईल स्पेशल! नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी Avocado Toast
संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं भूक लागते. अशावेळी नेमकं काय खावं हे बऱ्याचदा सुचत नाही. कायमच नाश्त्यात सामोसा, वडापाव किंवा इतर तेलकट पदार्थ खाल्ले जातात. पण सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. शरीरात कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह वाढल्यानंतर शरीरात अनेक गंभीर बदल दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये अॅव्होकाडो टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. अॅव्होकाडो आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले नैसर्गिक आणि गुणकारी घटक शरीराला पोषण देतात. अॅव्होकाडोमध्ये निरोगी चरबी, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि पचनक्रिया कायमच निरोगी राहते. चला तर जाणून घेऊया अॅव्होकाडो टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा ढाबा स्टाईल मशरूम मसाला; रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पर्याय