Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या

Bakarwadi Recipe : बाकरवाडी हा महाराष्ट्रात हमखास विकत मिळणारा लोकप्रिय स्नॅक. याची चव लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच फार आवडते. तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीच फ्रेश आणि महिनाभर टिकणारी बाकरवाडी तयार करु श

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 03, 2026 | 10:24 AM
महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स... मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची 'बाकरवडी' घरी कशी बनवायची ते जाणून घ्या

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स... मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची 'बाकरवडी' घरी कशी बनवायची ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • बाकरवडी चवीला मसालेदार आणि कुरकुरीत लागते.
  • चहासोबत खाण्यासाठी किंवा ऑफीस स्नॅक्ससाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.
  • आज आपण मार्केट स्टाईल बाकरवडी घरी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेणार आहोत.
बाकरवडी हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि चटकदार स्नॅक आहे. विशेषतः पुणे आणि आसपासच्या भागात ही डिश खूप प्रसिद्ध आहे. कुरकुरीत बाहेरील आवरण आणि आतल्या मसालेदार, गोड-तिखट चवीच्या सारणामुळे बाकरवडीला एक वेगळीच ओळख मिळते. चहा वेळेस किंवा प्रवासात खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. घरच्या घरी बनवलेली बाकरवडी अधिक चवदार आणि ताजी लागते, तसेच आपण आपल्या आवडीनुसार मसाल्याचे प्रमाणही ठरवू शकतो. चला तर मग घरच्या घरी बाकरवडी कशी बनवायची याची एक सोधी, सोपी रेसिपी जाणून घेऊया.

Recipe : हॉटेलसारखी मसालेदार आणि क्रिमी पनीरची भाजी कशी बनवायची? आजच रेसिपी जाणून घ्या

साहित्य

आवरणासाठी:

  • 1 कप मैदा
  • 2 टेबलस्पून बेसन
  • 2 टेबलस्पून तेल
  • चिमूटभर हळद
  • मीठ चवीनुसार
  • पाणी (पीठ मळण्यासाठी)
सारणासाठी:
  • 1/2 कप किसलेले सुके खोबरे
  • 2 टेबलस्पून खसखस
  • 1 टेबलस्पून तीळ
  • 1 टेबलस्पून धणे पूड
  • 1 टीस्पून जिरे पूड
  • 1 टीस्पून लाल तिखट
  • 1 टीस्पून गरम मसाला
  • 1 टेबलस्पून साखर
  • 1 टेबलस्पून चिंच-गूळ चटणी
  • मीठ चवीनुसार
  • तळण्यासाठी तेल
Healthy Recipe : हेल्दी पण टेस्टी असं काही खायचंय? मग जान्हवी कपूरची फेव्हरेट डिश ‘लो-कार्ब नूडल्स’ घरी बनवून खा

कृती

  • सर्वप्रथम एका भांड्यात मैदा, बेसन, मीठ, हळद आणि गरम तेल घालून नीट मिक्स करा. त्यात थोडं-थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळा. झाकून 15-20 मिनिटे बाजूला ठेवा.
  • कढईत खसखस, तीळ आणि सुके खोबरे हलके भाजून घ्या. ते थंड झाल्यावर त्यात धणे पूड, जिरे पूड, लाल
  • तिखट, गरम मसाला, मीठ, साखर आणि चिंच-गूळ चटणी घालून नीट मिक्स करा.
  • मळलेलं पीठ घेऊन त्याचे छोटे गोळे करा. प्रत्येक गोळ्याची पातळ पोळी लाटा.
  • लाटलेल्या पोळीवर तयार सारण समान पसरवा आणि हलक्या हाताने दाबा.
  • पोळी घट्ट गुंडाळून रोल तयार करा.
  • तयार रोलचे छोटे-छोटे तुकडे कापा आणि हलक्या हाताने दाबून आकार द्या.
  • कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर बाकरवडी कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • भाकरवडी तळताना आच मध्यम ठेवा, त्यामुळे ती आतूनही नीट शिजते.
  • सारणात गोड-तिखट प्रमाण आपल्या चवीनुसार बदलू शकता.
  • पूर्ण थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवा, त्यामुळे ती जास्त दिवस कुरकुरीत राहते.
  • ही घरगुती बाकरवडी चहा सोबत किंवा पाहुण्यांसाठी नक्कीच सर्वांना आवडेल.

Web Title: How to make bakarwadi at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 10:24 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी
1

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी
3

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
4

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.