Paneer Subji Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी पनीर म्हणजे पर्वणीच! पण घरी जेव्हा पनीरची भाजी बनवली जाते तेव्हा ती हाॅटेलसारखी बनत नाही. आजची ही रेसिपी तुम्हाला ती चव घरी मिळवून देण्यास मदत करेल.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
पनीरची भाजी सर्वांच्याच आवडीची ठरते.
हाॅटेलमधील हा एक लोकप्रिय पदार्थ आहे.
पण हाॅटेलमध्ये कशाला घरीच बनवा हॉटेलसारखी पनीरची भाजी.
भारतीय स्वयंपाकात पनीर हा एक अत्यंत लोकप्रिय आणि बहुपयोगी पदार्थ आहे. शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जाणारा पनीर चव आणि पोषण यांचा सुंदर समतोल साधतो. विशेष प्रसंगी, पाहुण्यांसाठी किंवा रोजच्या जेवणात काहीतरी वेगळं बनवायचं असेल, तर पनीरची भाजी हा नेहमीच उत्तम पर्याय ठरतो. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या पनीरच्या भाज्यांचा खास स्वाद घरी तयार करणे शक्य आहे, फक्त योग्य पद्धत आणि मसाल्यांचा समतोल साधणे महत्त्वाचे असते. घरच्या घरी बनवलेली पनीर भाजी केवळ चविष्टच नसते, तर ती स्वच्छ आणि पौष्टिकही असते. ताजी भाजी, सुगंधी मसाले आणि मऊसर पनीर यामुळे ही डिश सर्वांना आवडते. चला तर मग, सोप्या पद्धतीने पनीरची स्वादिष्ट भाजी कशी बनवायची याची रेसिपीजाणून घेऊयात.