सकाळच्या नाश्त्यासाठी घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा लोहयुक्त बीटचे आप्पे
सकाळच्या नाश्त्यात अनेकदा काय बनवावं? हे सुचत नाही. कांदापोहे, उपमा, शिरा इत्यादी पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही बीटचे आप्पे बनवू शकता. चवीला तुरट असलेले बीट लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खायला आवडत नाही. बीट पहिले की नाक मुरडतात. मात्र आरोग्याच्या दृष्टीने बीट अतिशय पौष्टिक आहे. बीटमध्ये लोह, फायबर, विटामिन सी इत्यादी अनेक घटक आढळून येतात. शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर डॉक्टरसुद्धा बीट खाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बीटचे आप्पे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया आप्पे बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यात बनवा मसाला फ्रेंच टोस्ट, लहान मुलं खातील आवडीने