पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी! बीटपासून झटपट बनवा गुलाबी कटलेट
दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी आहारात बीटचे सेवन करावे. बीट खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले लोह, फोलेट, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात बीट खावे. बीटपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बीटचे कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ अतिशय कमी साहित्यामध्ये तयार होतो. याशिवाय बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं, सुचत नाही. अशावेळी बीट कटलेट अतिशय उत्तम पर्याय आहे. लहान मुलांना बीट खायला अजिबात आवडत नाही. बीटचे नाव घेतल्यानंतर नाक मुरडतात. पण लहान मुलांना कोणत्या ना कोणत्या पदार्थांमधून बीट खाण्यास द्यावे. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये बीट कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळा संपण्याआधी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गरमागरम पालक-कॉर्न सूप, सर्दीपासून मिळेल सुटका
भाजी बनवायचा कंटाळा आलाय? मग झटपट बनवा राजस्थानची फेमस डिश मलाई प्याज