
हिवाळ्यात गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट बीटरूट हलवा
थंडीच्या दिवसांमध्ये घरात अनेक वेगवेगळे पदार्थ कायमच बनवले जातात. कधी गाजर हलवा तर कधी गरमागरम सूप बनवले जाते. थंडीत शरीरात उष्णता कायम टिकवून ठेवण्यासाठी उष्ण पदार्थ खाल्लेले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बीटरूट हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यापूर्वी तुम्ही गाजर हलवा किंवा दुधी भोपळ्यापासून बनवलेला हलवा खाल्ला असेलच. लहान मुलांसह मोठ्यांना बीटरूट खायला अजिबात आवडत नाही. बीटचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात. अशावेळी मुलांना बीटपासून अनेक नवनवीन पदार्थ बनवून खाण्यास द्यावेत. बीटरूटमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि फोलेट इत्यादी भरपूर प्रमाणात आढळून येतात. याशिवाय बीट खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो, रक्तवाहिन्या स्वच्छ होतात, पचनक्रिया सुधारते, रक्त वाढण्यास मदत होते. हृद्य आणि मेंदूच्या निरोगी कार्यासाठी नियमित बीटचा रस किंवा कच्चे बीट खावे. यामुळे शरीरात कधीच रक्ताची कमतरता भासणार नाही. चला तर जाणून घेऊया बीटरूट हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
हाडे मजबूत करून… कर्करोगाचा धोकाही कमी करते पालक; भाजी नाही यंदा बनवा गरमा गरम ‘पालक डाळ’