
सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा पौष्टिक बीटची टिक्की
लहान मुलांसह मोठ्यांनादेखील बीट खायला आवडत नाही. मात्र आरोग्यासाठी बीट खाणे अतिशय पौष्टिक आहे. दैनंदिन आहारात नियमित बीटचे सेवन केल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल. याशिवाय कमी झालेले हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीट खाण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बीटचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट टिक्की बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पदार्थाचे तुम्ही सकाळच्या नाश्त्यात सुद्धा सेवन करू शकता.वाढलेले वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही बीटच्या टिक्कीचे सेवन करू शकता. अनेक महिला वजन कमी करण्यासाठी सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र असे केल्यामुळे वजन आणखीनच वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया बीट टिक्की बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)
चवीला बेचव लागणाऱ्या ओट्सपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट ओट्स खीर, वाचा सोपी रेसिपी