कडू कारलं आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत कारल्याची चटणी
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना कारल्याची भाजी खायला आवडत नाही. कारल्याच्या भाजीचे नाव घेतल्यानंतर लगेच नाक मुरडतात. मात्र आरोग्यासाठी कारल्याची भाजी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. भाजीमधील कडवट पणामुळे कारल्याची भाजी कोणालाच खायला आवडत नाही. तर काहींच्या घरात कारल्याची भाजी आणलीच जात नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कडवट कारल्याची कुरकुरीत चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कारल्याची कुरकुरीत चटणी घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडेल. औषधी गुणधर्मानी समृद्ध असलेली कारल्याची भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय आरोग्यदायी ठरते. या भाजीपासून रस, भाजी किंवा कारल्याचे भरीत बनवले जाते. चला तर जाणून घेऊया कारल्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
साधा, सोपा, झटपट नाश्ता! घरी बनवून पाहा Egg Burger; निवडक साहित्यांची गरज अन् 10 मिनिटांतच होतो तयार