
कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा चमचमीत काळ्या चण्याची आमटी
जेवणाच्या ताटात जर भात नसेल तर जेवल्यासारखे वाटत नाही. ताटात भात, डाळ, भाजी, चपाती किंवा भाकरी सगळेच आवडीने खातात. पण कायमच गोडी किंवा तिखट डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि मसालेदार पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. थंडीच्या दिवसांमध्ये तिखट पदार्थ आवडीने खाल्लेले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जेवणाची रंगत वाढवण्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये काळ्या चण्याची आमटी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. काळे चणे चवीसोबतच आरोग्यासाठी खूप जास्त पौष्टिक असतात. या चण्यांपासून चाट, भाजी, आमटी, टिक्की इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. तिखट चवीची मसालेदार काळ्या चण्याची आमटी गरमागरम भाकरी आणि भातासोबत सुंदर लागते. जेवणात जर काळ्या चण्याची आमटी असेल तर चार घसा जास्त जातात. थंडीच्या दिवसांमध्ये कोकणात आमटी भात किंवा माशांची आमटी इत्यादी पदार्थ आवडीने बनवून खाल्ले जातात. चला तर जाणून घेऊया काळ्या चण्याची आमटी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)