सकाळच्या नाश्त्यात मुलांना खाण्यास द्या पौष्टिक आणि पारंपरिक चवीची नाचणी खिचडी
आईच्या गर्भात बाळाचे अवयव तयार होतात. त्यानंतर नऊ महिन्यांनी बाळाला जन्म दिल्यानंतर शरीरासाठी पोषण देण्यासाठी स्तनपान केले जाते. बाळ हळूहळू रांगायला लागल्यानंतर पाणी, दूध याशिवाय भरडी, नाचणी सत्व इत्यादी मऊ आणि सहज पचन होणारे पदार्थ खाण्यास दिले जाते. नाचणीपासून बनवलेले पदार्थ लहान मुलांना भरपूर पोषण देतात. यामुळे मुलांच्या शरीरातील हाडांचा आणि संपूर्ण आरोग्याचा सर्वंगीण विकास होतो. हाडे मजबूत होऊन हळूहळू बाळाचे वजन वाढते. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह (आयर्न), मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांना नाचणीपासून बनवलेले पदार्थ खाण्यास द्यावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नाचणीची खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. नाचणी खिचडी लहान मुलांसह मोठे सुद्धा खाऊ शकतात. नियमित वाटीभर नाचणी खिचडीचे सेवन केल्यास दुपारी लवकर भूक लागणार नाही. दीर्घकाळ पोट भरलेले राहील. चला तर जाणून घेऊया नाचणी खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
Christmas 2025 : सणाचा गोडवा वाढवा, ओरिओ बिस्किटांपासून घरी बनवा ‘ख्रिसमस केक’






