Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या जेवणासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काळ्या चण्यांचे चाट, शरीरातील हाडे राहतील दीर्घकाळ मजबूत

रात्रीच्या जेवणात कायमच तिखट आणि तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही काळ्या चण्याचे चाट बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 04, 2026 | 01:12 PM
रात्रीच्या जेवणासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काळ्या चण्याचे चाट

रात्रीच्या जेवणासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काळ्या चण्याचे चाट

Follow Us
Follow Us:

दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर होतो. आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर शरीराची पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये अतिशय हलक्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चाट खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही विविध कडधान्यांपासून चाट बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला काळ्या चण्यांचे हेल्दी टेस्टी चाट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. काळ्या चण्यांमध्ये भरपूर फायबर आढळून येते. फायबर युक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीराची पचनक्रिया सुरळीत चालू राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच यामध्ये आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम इत्यादी अनेक घटक सुद्धा आढळून येतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आहारात काळ्या चण्याचे चाट किंवा काळ्या चण्याची भाजी बनवून खावी. यामध्ये असलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियममुळे शरीरातील हाडे मजबूत राहतात. चला तर जाणून घेऊया काळ्या चण्याचे चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

उन्हाळयात १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट काकडीचे धिरडे, शरीरात टिकून राहील थंडावा

साहित्य:

  • शिजवलेले काळे चणे
  • रताळ
  • चाट मसाला
  • लाल तिखट
  • लिंबाचा रस
  • कांदा
  • टोमॅटो
  • जिऱ्याची पावडर
  • काकडी
  • पनीर
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • पुदिना
  • लिंबू
  • तेल
महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या

कृती:

  • काळ्या चण्यांचे हेल्दी चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, काळे चणे आणि रताळ शिजवून घ्या. रताळ कुकरमध्ये जास्त शिजवू नये.
  • मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिना आणि चिंच गर घालून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात शिजवलेले काळे चणे हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत शिजवा. त्यानंतर त्यात पनीरचे तुकडे घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • मोठ्या वाटीमध्ये भाजून घेतलेले चणे, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, काकडी घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात रताळ्याचे तुकडे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, तयार केलेली चिंच कोथिंबीर चटणी घालून हलक्या हाताने मसाज करा.
  • त्यानंतर त्यात चाट मसाला, लाल तिखट, भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा आणि सगळ्यात शेवटी भाजलेले पनीर घाला.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हेल्दी टेस्टी काळ्या चण्याचे चाट.

Web Title: How to make black gram chaat at home simple food recipe benefits of black gram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी
1

Recipe : १ कप तांदळापासून बनवा मऊ आणि दानेदार मिठाई! मावा आणि मिल्क पावडरशिवाय तयार होते रेसिपी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काय खावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट राजगिरा उपमा, नोट करा रेसिपी

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी
3

Soup Recipe: वातावरणातील बदलांमुळे सतत आजारी पडता? निरोगी राहण्यासाठी नियमित करा Pumpkin Soup चे सेवन, नोट करा रेसिपी

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
4

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.