तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी
जेवणाची चव वाढवण्यासाठी ताटात अनेक वेगवेगळे पदार्थ वाढले जातात. जेवणात कायमच डाळ, भात, भाजी, चपाती इत्यादी ठराविक पदार्थ बनवून खाल्ले जातात. पण गोडसर आणि मिळमिळीत जेवण खाण्याचा खूप जास्त कंटाळा येतो. सगळ्यांचं झणझणीत पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जेवणाची चव वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये हिरव्या मिरच्यांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हिरव्या मिरच्यांचा वापर जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. डाळ किंवा भाजीला फोडणी देताना त्यात हिरव्या मिरच्या टाकल्या जातात. प्रत्येक मराठी माणसांच्या घरात ठेचा असतोच. ठेचा गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत अतिशय सुंदर लागतो. घाईगडबडीच्या वेळी भाजी बनवण्यास बऱ्याचदा वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही हिरव्या मिरच्यांची चटणी बनवू शकता. जाणून घ्या हिरव्या मिरच्यांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)