सँडविच बनवताना ब्रेडला लावा 'हा' हेल्दी पदार्थ
घरातील प्रत्येक व्यक्तीला सँडविच खायला खूप जास्त आवडते. सँडविचचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. याशिवाय कुठेही फिरायला गेल्यानंतर बाहेर अतिशय आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे सँडविच. काहींना ग्रील सँडविच खायला आवडते तर काहींना भरपूर भाज्या घालून बनवलेले सँडविच खायला खूप जास्त आवडते. लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा बाहेर फिरायला जाताना तुम्ही मिश्र भाज्यांचे सँडविच बनवून खायला नेऊ शकता. यानिमित्ताने लहान मुलांसह मोठ्यांच्या शरीरात भाज्या जातात. सँडविच बनवताना त्यावर चीज, सॉस किंवा मेयोनिज मोठ्या प्रमाणावर लावले जाते. पण आज आम्ही तुम्हाला सँडविचवर लावण्यासाठी घरच्याघरीच ब्रेड स्प्रेड बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले ब्रेड स्प्रेड चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया घरच्याघरीच ब्रेड स्प्रेड बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)
स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा रवाळ कलाकंद, नोट करून स्वादिष्ट गोड पदार्थ
Sunday होईल आणखीनच मजेदार! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा बटाटा सँडविच, नोट करा रेसिपी