
मार्गशीषमधील पहिल्या गुरुवारी देवीच्या नैवेद्यासाठी झटपट बनवा गाजर खीर
मार्गशीष महिन्यातील आज पहिला गुरुवार आहे. यादिवशी घरात देवीची घटस्थापना करून मनोभावे पूजा केली जाते. यासोबतच घरात नैवेद्यासाठी अनेक वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जातात. कायमच शिरा, शेवयांची खीर, रबडी इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दाटसर गाजर खीर बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात गाजर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. गाजर चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी आहे. सॅलड किंवा कोशिंबीर बनवताना गाजरचा वापर केला जातो. गाजरमध्ये विटामिन ए, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. तसेच डोळ्यांची कमकुवत झालेली दृष्टी सुधारण्यासाठी गाजरचे सेवन करावे. रोजच्या आहारात नियमित गाजर खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यासोबतच शरीराला भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये गाजर खीर बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)