Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast : सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पाैष्टीक आणि चविष्ट ‘गाजराचे थालीपीठ’, टीफिनसाठी रेसिपी ठरेल परफेक्ट

Thalipeeth Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी खरपूस भाजलेले थालिपीठ एक चांगला पर्याय ठरतो. याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फार आवडते. मुलांच्या टिफीनसाठीही ही रेसिपी एक चांगला पर्याय ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 04, 2026 | 09:02 AM
Breakfast : सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पाैष्टीक आणि चविष्ट 'गाजराचे थालीपिठ', टीफिनसाठी रेसिपी ठरेल परफेक्ट

Breakfast : सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पाैष्टीक आणि चविष्ट 'गाजराचे थालीपिठ', टीफिनसाठी रेसिपी ठरेल परफेक्ट

Follow Us
Follow Us:
  • थालीपीठ हा महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील एक लोकप्रिय पदार्थ आहे.
  • हा पदार्थ फक्त चवीलाच चांगला लागत नाही तर आरोग्यासाठीही पाैष्टीक ठरतो.
  • आज या लेखात आपण गाजराचे थालिपीठ कसे तयार करायचे ते जाणून घेणार आहोत.
पारंपरिक थालीपीठ हा महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय आणि पौष्टिक पदार्थ आहे. वेगवेगळ्या पिठांचे मिश्रण, मसाले आणि भाज्यांचा वापर करून तयार होणारे थालीपीठ चवदार तर असतेच, शिवाय शरीरासाठीही लाभदायक ठरते. त्यात गाजराचा समावेश केल्यास या पदार्थाची पौष्टिकता आणखी वाढते. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक आवश्यक पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

Paneer Corn Sandwich: झटपट आणि हेल्दी नाश्ता हवा? मग ट्राय करा पनीर- कॉर्न सँडविच, वाचा सोपी रेसिपी

गाजर थालीपीठ हा नाश्ता, डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पदार्थ कमी वेळात तयार होतो आणि रोजच्या आहारात पौष्टिक बदल घडवून आणतो. चला रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • २ कप थालीपीठ भाजणी
  • १ कप किसलेले गाजर
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
  • २ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ टीस्पून जिरे
  • १/२ टीस्पून हळद
  • १ टीस्पून लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • १ चमचा तिळ
  • थालीपीठ भाजण्यासाठी तेल किंवा तूप
विकतचे चॉकलेट आणून खाण्यापेक्षा मुलांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक Energy Bar, नोट करा रेसिपी

कृती

  • मोठ्या भांड्यात थालीपीठ भाजणी घ्या. त्यात किसलेले गाजर, कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे, हळद, लाल तिखट, तिळ आणि मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा.
  • आता थोडे-थोडे पाणी घालत मऊसर पण घट्टसर पीठ मळून घ्या. पीठ १० मिनिटे झाकून ठेवा, त्यामुळे भाजणी आणि गाजर एकजीव होतील.
  • तवा गरम करून त्याला हलके तेल लावा. केळीच्या पानावर, प्लास्टिक शीटवर किंवा ओल्या कापडावर पिठाचा गोळा ठेवून हाताने थालीपीठ थापा आणि मध्ये तसेच बाजूला लहान छिद्रे करा.
  • थापलेले थालीपीठ काळजीपूर्वक गरम तव्यावर टाका. छिद्रांमध्ये आणि कडेला थोडे तेल किंवा तूप सोडा.
  • मध्यम आचेवर झाकण ठेवून ३ ते ४ मिनिटे भाजा. नंतर थालीपीठ उलटून दुसरी बाजूही सोनेरी आणि खरपूस होईपर्यंत भाजून घ्या.
  • अशाच प्रकारे उरलेल्या पिठाची सर्व थालीपीठे तयार करा. प्रत्येक वेळी तव्यावर थोडे तेल लावल्यास थालीपीठ छान भाजले जाते.
  • गरमागरम गाजर थालीपीठ दही, लोणी, तूप, लोणचे किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Web Title: How to make carrot thalipeeth at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 09:01 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
1

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.