विकतचे चॉकलेट आणून खाण्यापेक्षा मुलांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक Energy bar, नोट करा रेसिपी
बाहेर कुठेही फिरायला गेल्यानंतर मुलं लगेच चॉकलेट खाण्याचा हट्ट करतात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. पण शाळेच्या डब्यात किंवा छोटीशी भूक लागल्यानंतर मुलांना काय खायला द्यावे? असा प्रश्न सर्वच पालकांना कायमच पडतो. बाजारात मिळणाऱ्या चॉकलेट्स, बिस्किटे किंवा रेडीमेड स्नॅक्समध्ये साखर, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि कृत्रिम घटकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे मुलांना विकतचे पदार्थ खायला देण्याऐवजी घरी बनवलेले हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास द्यावेत. आज आम्ही तुम्हाला मुलांच्या डब्यासाठी झटपट पौष्टिक एनर्जी बार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले एनर्जी बार घरातील लहान मुलांसह मोठेसुद्धा अतिशय आवडीने खातील. मुरमुरे, पीनट बटर, मनुके, भोपळ्याच्या बिया आणि डार्क चॉकलेट शरीरासाठी फायदेशीर आहे. यामध्ये ऊर्जा, प्रोटीन, फायबर, हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे कायमच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
नाचणीत दडलंय दूधाहून जास्त कॅल्शियम… अशाप्रकारे डाएटमध्ये करा सामील, हाड होतील लोखंडासारखी मजबूत






