
काजूचे कालवण बनवण्याची सोपी रेसिपी
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोकणात मोठ्या प्रमाणावर काजू उपलब्ध असतात. सुकलेले काजू चवीला अतिशय सुंदर लागतात. ठराविक महिन्यांमध्ये बाजारात काजू उपलब्ध असतात. त्यामुळे अनेक लोक ओले काजू गर सुकवून वर्षभरासाठी साठवून ठेवतात. ओल्या काजूंची भाजी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. गरमागरम भाकरी आणि काजूची भाजी असेल तर जेवणात चार घास जास्त जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सुकलेल्या काजूचे कालवण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. जेवणात कायमच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही काजू मसाला किंवा काजूचे कालवण बनवू शकता. चला तर जाणून घेऊया काजूचे कालवण बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
मराठवाडा स्पेशल रेसिपी! डब्यासाठी झटपट बनवा चविष्ट कुरडई भाजी, पारंपरिक पदार्थाने वाढेल जेवणाची चव