ओव्हनचा वापर न करता घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheesecake
वाढदिवस, लग्न समारंभ, साखरपुडा किंवा इतर कोणत्याही शुभ कार्याच्या दिवशी घरात केक आणला जातो. केक आणून सेलिब्रेशन केले जाते. बाजारात अनेक वेगवेगळ्या फ्लेवोर्सचे केक उपलब्ध आहेत. चॉकलेट, स्ट्रॉबेरी, व्हॅनिला, मँगो इत्यादी अनेक वेगवेगळ्या फ्लेवोर्सचे केक आणले जातात. त्यातील सगळ्यांचा आवडीचा केक म्हणजे चीजकेक. घरातील प्रत्येक व्यक्तीला चीजकेक खायला खूप आवडतो. चीज आणि बेरीजचा सॉस तयार करून बनवलेला केक चवीला अतिशय सुंदर लागतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओव्हनचा वापर न करता चीजकेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चीज केक बनवण्यासाठी ओव्हनची गरज लागत नाही. बऱ्याचदा लहान मुलं सतत केक खाण्यास मागतात. अशावेळी मुलांना नेहमीच बाहेरून विकत आणलेला केक खाण्यास देण्यापेक्षा घरी बनवलेला केक द्यावा. चला तर जाणून घेऊया चीजकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
दुपारच्या जेवणात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा ज्वारीचे पिठाचे चविष्ट थालीपीठ
दूध न आटवता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा घट्ट-रवाळ रबडी! पुरीसोबत लागेल सुंदर चव