दूध न आटवता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा घट्ट-रवाळ रबडी
भारतीय पदार्थांमध्ये रबडीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं रबडी खायला खूप जास्त आवडते. रबडीचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. गोड आणि चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर बाजारातून विकत रबडी किंवा गुलाबजाम आणले जाते. मात्र नेहमीच विकतची रबडी खाण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रबडी बनवू शकता. आपल्यातील अनेकांना नेहमीच असे वाटते की रबडी बनवण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो, तासनतास दूध गॅसवर आटवून घ्यावे. पण आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये झटपट रबडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली रबडी चवीला अतिशय सुंदर लागते. पुरी किंवा चपातीसोबत तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता. रबडी घट्ट होण्यासाठी त्यात दह्याचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया घट्ट आणि रवाळ रबडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)
संध्याकाळ होईल आणखीन मजेदार; घरी बनवा चवदार अन् थंडगार दहीवडा, खूप सोपी आहे रेसिपी
पिकलेलं केळ खायला आवडत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा केळीचे खमंग आप्प्पे, नोट करा रेसिपी