
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास घरीच सोप्या पद्धतीमध्ये बनवा कॅफे-स्टाईल Chocolate Brownie
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. लहान मुलं कायमच चॉकलेटसाठी हट्ट करतात. कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा ववाढदिवसानिमित्त घरात चॉकलेट, केक किंवा चॉकलेट ब्राऊनी विकत आणली जाते. यामुळे लहान मुलांसोबत घरातील इतर सदस्यांचा सुद्धा उत्साह वाढतो. तसेच गोड खाण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच चॉकलेट विकत आणून खाल्ले जाते. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कॅफे स्टाईल चॉकलेट ब्राऊनी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली ब्राऊनी लहान मुलांसह घरातील सर्वच सदस्यांना खूप जास्त आवडेल. पण बऱ्याचदा कोणताही फेल्व्हरचा केक किंवा ब्राऊनी बनवताना काहींना काही गडबड होऊन जाते. ब्राऊनी बनवताना मऊपणा, चॉकलेटी चव आणि फिकट पोत व्यवस्थितबनवणे आव्हानात्मक असते. चला तर जाणून घेऊया चॉकलेट ब्राऊनी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)