
ओल्या खोबऱ्याचा वापर करून घरीच बनवा चविष्ट नारळाची बर्फी
सणावाराच्या दिवसांमध्ये घरात अनेक नवनवीन गोड पदार्थ बाहेरून विकत आणले जातात. श्रीखंड, काजुकतरी, पेढा, रसगुल्ला इत्यादी अनेक पदार्थ घरी आलेल्या पाहुण्यांसाठी आणले जातात. पण कायमच विकतचे आणि भेसळ युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. घरी बनवलेले पदार्थ चवीसाठी आरोग्यासाठी सुद्धा गुणकारी असतात. आज आम्ही तुम्हाला ओल्या खोबऱ्याची चविष्ट बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ओल्या खोबऱ्याचा वापर जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. कधी वाटप बनवण्यासाठी तर कधी डाळीमध्ये आणि भाजीमध्ये टाकण्यासाठी केला जातो. खोबऱ्याचा किस गोड असल्यामुळे पदार्थाची चव अतिशय सुंदर लागते.ओल्या खोबऱ्याची बर्फी तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया ओल्या खोबऱ्याची बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
Recipe : साधा चिला नाही यावेळी नाश्त्याला खा ‘पनीर स्टफ्ड चिला’, चवीसह आरोग्याचीही काळजी