फादर्स डे निमित्त लाडक्या वडिलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा क्रिमी बटरस्कॉच मूस
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वडील अतिशय महत्वाचे असतात. वडील मुलांच्या आनंदासाठी सतत काहींना काही करत असतात. दिवसरात्र कष्ट करून मुलांना शिक्षण देणे, त्यांचे पालनपोषण करणे, त्यांचे संगोपन करणे इत्यादी सर्वच जबाबदाऱ्या आईवडिलांकडे असतात. दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. वडिलांवरील प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी मोठ्या उत्साहात फादर्स डे साजरा केला जातो. या दिवशी सर्वच मुलं आपल्या वडिलांना सुंदर भेटवस्तू गिफ्ट देतात. तर वडिलांसाठी छान गोड पदार्थ घेऊन जातात. पण बाहेरील विकतचे पदार्थ आणण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी क्रिमी बटरस्कॉच मूस बनवू शकता. तुम्ही बनवलेला गोड पदार्थ तुमच्या वडिलांना नक्कीच खूप जास्त आवडेल. तुम्ही बनवलेला गोड पदार्थ वडिलांसोबतच घरातील सगळेच लोक आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया क्रिमी बटरस्कॉच मूस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)