दुपारच्या जेवणातील वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी बनवा कुरकुरीत कारल्याचे काप
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं कारल्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही.कारल्याच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर सगळेच नाक मुरडतात. पण आरोग्याच्या दृष्टीने कारल्याची भाजी अतिशय गुणकारी आणि पौष्टिक आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक रक्तातील साखर कायमच नियंत्रणात ठेवण्यासाठी कारल्याच्या रसाचे सेवन केले जाते. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक लोक कारल्याच्या भाजीचे सेवन करतात. कारल्याची भाजी झटपट तयार होते. आज आम्ही तुम्हाला जेवणात तोंडी लावण्यासाठी कारल्याचे कुरकुरीत काप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कारल्याचे काप चवीला अतिशय सुंदर लागतात. जेवणाच्या ताटात जर कारल्याचे काप असतील तर चार घास जेवण जास्त जाईल. चला तर जाणून घेऊया कुरकुरीत कारल्याचे काप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा टोमॅटो सूप, शरीर राहील उबदार