जेवणाच्या ताटात गरमागरम वरण भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत मसालेदार कारली फ्राय
कारल्याच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर सगळेच नाक मुरडतात. चवीला कडू असलेली कारली खायला कोणालाच आवडत नाही. पण कारलं आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले घटक शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी कारल्याच्या रसाचे सेवन करावे. कडू चवीची पौष्टिक भाजी शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करते. आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत मसालेदार कारली फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ गरमागरम भात डाळीसोबत अतिशय सुंदर लागेल. घाईगडबडीच्या वेळी डब्यासाठी भाजी काय बनवावीस सुचत नाही. अशावेळी कारली फ्राय बनवू शकता. लहान मुलांना कारली खायला आवडत नाही, पण या पद्धतीने बनवलेली कारली फ्राय लहान मुलं आवडीने खातील. चला तर जाणून घेऊया कुरकुरीत मसालेदार कारली फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
जेवणाची चव वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आवळ्याचे पौष्टिक लोणचं, आरोग्यासाठी ठरेल गुणकारी