तोच तोच पास्ता खाऊन कंटाळलात? मग आता 10 मिनिटांत बनवा ‘क्रिस्पी पास्ता’; संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
Crispy Pasta : पास्ता तर आपण बऱ्याचदा खाल्ला असेल पण तुम्ही कधी कुरकुरीत चवीचा क्रिस्पी पास्ता खाल्ला आहे का? स्टार्टर्ससाठीचा हा पदार्थ अवघ्या काही मिनिटांतच तयार होतो आणि चवीलाही लाजवाब लागतो.
नेहमीचा पास्ता नाही तर यावेळी बनवा तळलेला कुरकुरीत पास्ता.
पास्ता लव्हर्सना ही रेसिपी नक्कीच आवडेलं.
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा स्टार्टर्ससाठी हा पदार्थ एकदम परफेक्ट आहे.
आजकाल पास्ता म्हटलं की फक्त उकडलेला, सॉसी किंवा चीजी पास्ता एवढाच विचार डोळ्यासमोर येतो. पण त्याच पास्त्याचा कुरकुरीत (क्रिस्पी) अवतार तुम्ही घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता, हे माहिती आहे का? बाहेरून खमंग, आतून मऊ आणि चवीला अप्रतिम असा क्रिस्पी पास्ता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. हा पास्ता खास करून संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, पार्टी स्टार्टर म्हणून किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. बाजारात मिळणाऱ्या जंक फूडपेक्षा हा पास्ता स्वच्छ, सुरक्षित आणि आपल्या आवडीप्रमाणे मसालेदार बनवता येतो. थोडेसे भाज्या, भारतीय मसाल्यांचा तडका आणि योग्य पद्धतीने तळलेला पास्ता पदार्थाला हटके टच देऊन जातो. खास गोष्ट म्हणजे, या रेसिपीसाठी फार महाग साहित्य लागत नाही आणि कमी वेळात झटपट तयार होते. तुम्ही हा पास्ता डीप फ्राय, शॅलो फ्राय किंवा अगदी एअर फ्रायरमध्येही बनवू शकता. चला तर मग, घरच्या घरी कुरकुरीत आणि खमंग क्रिस्पी पास्ता कसा बनवायचा याची सोपी रेसिपीजाणून घेऊया.