भाजणीचा वापर न करता झटपट बनवा कुरकुरीत बटर चकली
दिवाळी सणाला सगळेच घाईगडबड असते. कारण दिवाळीचा फराळ, गोड पदार्थ, घरातील साफसफाई इत्यादी गोष्टींमध्ये वेळ कधी निघून जात, हे समजत नाही. फराळातील चकली बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. कारण चकली बनवण्यासाठी भाजणीचे पीठ तयार करावे लागते. वेगवेगळी धान्य आमी मसाल्यांचा वापर करून बनवलेल्या भाजणीच्या पिठापासून चकल्या बनवल्या जातात. भाजणीचे पीठ तयार करून पारंपरिक पद्धतीने चकली बनवली जाते. पण काहीवेळा चकलीची भाजणी व्यवस्थित तयार होत नाही आणि चकल्या पूर्णपणे बिघडून जातात. चकल्यांचा शेप बिघडण्यासोबतच तळल्यानंतर चकल्या अतिशय कठीण होऊन जातात. तर काहीवेळा चकलीला बुरशी लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कुरकुरीत बटर चकली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बटर चकली बनवण्यासाठी कोणत्याही भाजणीच्या पिठाची आवश्यकता लागत नाही. स्वयंपाक घरात असलेल्या पदार्थांपासून चकली तयार होते. जाणून घ्या चकली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)